प्रसन्न जोशीकडेच राहणार चॅनल हेडची जबाबदारी ?

मुंबई -जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये लवकरच प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या प्रसन्न जोशींचे आगमन होणार आहे.त्याची बातमी बेरक्यावर सर्वप्रथम झळकली.तोपर्यंत ही बातमी कोणालाच माहित नव्हती.जगाच्या बातम्या देणा-या जय महाराष्ट्र चॅनलमधील रिपोर्टर,अँकर आणि कर्मचा-यांनाही त्याची गंधवार्ता नव्हती.बेरक्यावर जेव्हा बातमी प्रसिध्द झाली,तेव्हा जय महाराष्ट्रमधील अनेक कर्मचा-यांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली आणि खात्री पडल्यानंतर अनेकांचा सुतकी चेहरा झाला.त्यातला त्यात विलास आठवलेसह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.
मित्रानो,आता एक नविन बातमी हाती येत आहे.प्रसन्न जोशी जय महाराष्ट्रमध्ये चॅनल हेड म्हणून येणार आहेत.सध्याचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे अधिकार कमी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.विलास आठवले जरी आता कार्यकारी संपादक असले तरी आहे त्या पदावर ठेवून फक्त इनपूटची जबाबदारी द्यायची की पुन्हा इनपूट हेड पदावर पाठवायचे,याबाबत जय महाराष्ट्रचे प्रशासन गांभिर्याने विचार करत आहे.
प्रसन्न जोशी हे एबीपी माझामध्ये अनेक वर्षे होते.रात्री ९ वाजता होणा-या माझा विशेषचे ते मुख्य एंकर होते.त्यांचा हा शो चांगलाच लोकप्रिय होता.मात्र आहे त्या पदावर किती दिवस काम करायचे,आता जाईन तर चॅनल हेड म्हणूनच जाईन असे त्यांचे स्वप्न होते.त्यांना झी २४ तास आणि आयबीएन लोकमतमध्ये मोठी ऑफर होती.परंतु त्यांना चॅनल हेड पद हवे होते आणि जय महाराष्ट्रने ते देवू केल्यानेच प्रसन्न जोशी यांनी एबीपी माझाला जय महाराष्ट्र केला आहे.
जय महाराष्ट्रचा टीआरपी वाढणार का ?

शैलेश लांबे यांच्या काळात जय महाराष्ट्र चॅनलमध्ये एक प्रकारची अवकळा आली होती.त्यांचा चमचा आनंदने पुर्ण वाटली आणि लांबेचीही वाट लावली.मात्र राजेश क्षीरसागर सीईओ झाल्यापासून चॅनलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
या चॅनलचा स्वीचर खराब झाला होता,तो २५ लाख रूपये खर्च करून नविन घेण्यात आला.त्यामुळे चॅनलचा लूक आकर्षक झाला आहे.त्याचबरोबर ग्राफीक्स् चेंज करण्यात आले आहेत.मात्र चॅनलला चेहरा नव्हता.विलास आठवले यांनी कामापेक्षा राजकारण जास्त केल्यामुळे अनेक कर्मचारी दु:खावले होते.अनेकजण राजीनामा देवून बाहेर पडत होते.त्यामुळं चॅनलला हवा होता,एक प्रसन्न चेहरा.त्यामुळचं जय महाराष्ट्रनं प्रसन्न जोशीना ऑफर दिली आहे.
प्रसन्न जोशी आल्यानंतर जय महाराष्ट्रचा टीआरपी वाढणार का ? एबीपी माझातील अनेक होतकरू कर्मचारी जे एबीपी माझात दु:खावले आहेत,ते जय महाराष्ट्रमध्ये येणार का,या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीय आहे.
जय महाराष्ट्रचा एकूण तोटा सध्या फक्त १२ टक्के आहे.तो भरून निघाल्यास हे चॅनल पुन्हा फॉर्मात येईल,अशी अपेक्षा आहेत.प्रसन्न जोशी जुलैच्या पहिल्या आठवड्यात जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होणार आहे.त्यांना बेरक्याच्या शुभेच्छा...