आशिष जाधव यांचा आयबीएन- लोकमतला अखेरचा रामराम....

> लवकरच नविन इनिंग सुरू करणार असल्याचे जाधव यांचे सुतोवाच...
> जाधव यांची Whats App वर फिरणारी पोस्ट
..............................................................
मित्रांनो, 
आज अखेर मी आयबीएन-लोकमतचा राजीनामा दिला. गेल्या सात-साडेसात वर्षांमध्ये माझं आणि आयबीएन-लोकमतचं घट्ट नातं अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलं. लोकसत्तासारख्या अग्रगण्य वर्तमानपत्रात स्थिरावल्यानंतर नवख्या इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये रिपोर्टिंग करण्याचा निर्णय सोपा नव्हता. बाईट जर्नलिझमच्या पलिकडे जाऊन इलेक्ट्रॉनिकचं रिपोर्टिंग व्हायलाच हवं, हे आधीपासूनंच मनात होतं. त्यामुळंच संपादक निखिल वागळेंच्या मार्गदर्शनाखाली माझ्यातल्या बूमधारी बातमीदाराला वेगळा ठसा उमटवता आला. आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये कुमार केतकर आणि राजीव खांडेकर यांचे लोकसत्तामध्ये लाभलेले मार्गदर्शन आणि निखिल वागळे यांचा आयबीएन-लोकमतमधल्या प्रोत्साहनामुळं माझ्यातला धडपड्या पत्रकार सतत जागरुक राहिला. या जागरुकतेमुळेच मला कामाचं समाधान मिळत होतं. पण का कुणास ठाऊक गेल्या सहा महिन्यांपासून कामाचं समाधान मिळेनासं झालं होतं. कदाचित आधी दिग्गज लोकांबरोबर काम केल्यानंतर एकाएकी आपल्या कामाचाच दर्जा घसरलाय की काय, या शंकेनं मी ग्रासलो गेलो. त्यामुळं वेळीच सावध होत मी आयबीएन-लोकमतचा आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. या राजीनाम्यानंतर माझ्यातला सजग पत्रकार अकाली संपण्यापूर्वी तो वाचवल्याचा मला आनंद होतोय.... आता पुन्हा नवी इनिंग सुरू करायची आहे.... तेव्हा लवकरंच कळवेन!
आपलाच....
आशिष जाधव