पुणे - नव जागृतीचे मालक राज गायकवाड यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही.एकीकडे कर्मचारी आणि स्ट्रींजरची देणी तर दुसरीकडे प्रक्षेपण केंद्राची कराराप्रमाणे ठरलेली रक्कम न भरल्यामुळे नव जागृतीचे प्रक्षेपण काल रात्रीपासून बंद पडले आहे.त्यामुळे हे चॅनल गाशा गुंडाळल्यात जमा आहे.दरम्यान,पेमेंट न दिल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी आणि स्ट्रींजरनी कामगार न्यायालयात दाद मागण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणे सुरू केले आहे.
नव जागृती चॅनल जानेवारी २०१५ मध्ये सुरू झाले होते.त्याअगोदर झालेल्या कर्मचारी आणि स्ट्रींजरच्या बैठकीत मालक राज गायकवाड यांनी फार मोठ्या गप्पा मारल्या होत्या.माझे रोज दोन करोड उत्पन्न असून,मराठी चॅनलबरोबीर हिंदी तसेच अनेक चॅनल काढणार असल्याची घोषणा केली होती.मात्र त्यांची घोषणा चिटफंड कंपनीसारखी फसवी ठरली आहे.राज गायकवाड यांची जागृती अॅग्रो फुडस् ही चिटफंड कंपनी असून,या कंपनीच्या जोरावरच त्यांनी मोठ्या गप्पा मारल्या होत्या.परंतु सेबीने काही निर्बंध घातल्यामुळे गायकवाड यांचा खेळ बंद पडत चालला आहे.
नव जागृती कर्मचा-यांचा एप्रिल,मे आणि जून महिन्याचा पगार थकलेला आहे.त्याचबरोबर स्ट्रींजरचेही एप्रिल,मे आणि जून महिन्याचे मानधन थकलेले आहे.मध्यंतरी बेरक्यावर बातमी झळकल्यावर स्ट्रींजरचे मार्च महिन्याचे मानधन मिळाले,तसेच कर्मचा-यांचे एप्रिल पगारापोटी अॅडव्हान्स पाच हजार रूपये देण्यात आले होते.उर्वरित संपूर्ण रक्कम १० जुलैपर्यंत देण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले होते.मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही.
ऐव्हडेच काय,ज्या ठिकाणी चॅनलचे प्रक्षेपण होते,तेथील केंद्राची रक्कम न भरल्यामुळे नव जागृती चॅनल काल रात्री स्वीच ऑफ करण्यात आले आहे.त्यामुळे डिश टीव्ही तसेच काही ठिकाणी केबलवर दिसणारे हे चॅनल गायब आहे.एकंदरीत रागरंग पाहता,या चॅनलने अवघ्या सहा महिन्यात गाशा गुंडाळला आहे.
कर्मचारी न्यायालयात जाणार...
एप्रिल ते जून पर्यंत पेमेंट तसेच चॅनल बंद केल्यामुळे वर्षभराचा पगार मिळावा,यासाठी अनेक कर्मचारी आणि स्ट्रींजर न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असून,त्यासाठी वकिलांचा सल्ला घेण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे गायकवाड यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
नव जागृती कर्मचाऱ्याना आणि स्ट्रींजर रिपोर्टरना आवाहन
आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कामगार न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो
Go to Asst Labor Commissioner
420, 32, 34 चा गुन्हा दाखल करा...
Indian Broadcasting Foundation
कड़े तक्रार करा
त्यांच्या कंटेंटविरोधात तक्रारी करा
इथेही तक्रार करा -
http://emmc.gov.in/
News Broadcasting Standards Authority
C/o News Broadcasters Association
Reg. Off.: 101-103, Paramount Tower
C-17, Community Center, Janakpuri,
New Delhi - 110 058.
Email: authority@nbanewdelhi.com