विनायक बेटावदकर यांचे दिनकर रायकर यांना पत्र

विनायक बेटावदकर
कल्याण वार्ताहर
संपर्क -९३२४८२३९८८
दि.९ जून२०१५


To,
श्री दिनकर रायकर,
समूह संपादक
लोकमत ,मुंबई.

स.न.वि.वि
मी लोकमतचा कल्याणचा अंशकालीन वार्ताहर म्हणून गेली सात-आठ वर्षे काम पहात आहे.या काळात माझ्या संबधात कुणाचीही कोणतीही तक्रार नव्हती.माझ्या बातम्याही व्यवस्थित प्रसिद्ध होत होत्या.
ठाणे कार्यालयात श्री नंदकुमार टेनी यांनी संपादक विभागाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आता एप्रिल २०१५ मध्ये मला बातम्या लिहिताच येत नाहीत,असे तोंडी सांगून काम थांबवायला सांगितले ,पण या दरम्यान माझे जानेवारी २०१५ते मार्च २०१५ चे वार्ताहर मानधन येणे बाकी आहे.१५ एप्रिल पर्यंत वाट पाहून मी लोकमत मधील रीना चव्हाण यांच्याकडे चौकशी केली तेव्हा श्री टेनी यांच्या सांगण्यावरून मानधन थांबवल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर टेनी याना वारंवार फोन करूनही अद्याप मानधन मिळाले नाही.मला काम थांबवण्याची त्यांनी तोंडी सुचना दिली पण लोकमत कडून कोणतीही लेखी सुचना आलेली नाही.त्यामुळे मी लोकमतमध्ये आहे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमतचे तत्कालीन संपादक म्हणून आपण कार्यरत असतानाच आपणच माझी नियुक्ती केली आहे. ज्यांनी नियुक्ती केली तेच (त्या पदावरील) कमी करू शकतात असे आपणच ‘जाहिरातींबाबत वार्ताहरावर सक्ती केली जात असताना घेतलेल्या बैठकीत निर्णय घेऊन वार्ताहराचे काम बातम्या देण्याचे आहे,जाहिराती गोळा करण्याचे नाही असे स्पष्टपणे सूचित केले होते,
या नंतर निवडणुकीच्या काळात लोकमतने काही उमेदवारांकडून काही ॅपकेजेस घेतले त्या काळातल्या उमेदवारांच्या बातम्या पाहिल्या तरी ते आपल्या लक्षात येईल.माझ्या कडून निवडणुकीसाठी नाही पण कल्याणच्या आगरी,कोळी मालवणी महोत्सवासाठी तीस हजार रुपयाच्या जाहिराती प्रथम घ्या नंतरच त्यांच्या बातम्या आपण छापू असे म्हणून नंद्कुमार टेनी यांनी जाहिराती घेतल्या त्याची पावती देवानंद भोईर यांच्या नावे दिली .मला कमिशनही दिले.पण त्यानंतर देवानंद भोईर यांच्या कार्यक्रमाची मला निमंत्रणे येणे बंद झाले.त्यांच्यात, माझ्यात दुरावा निर्माण झाला.
मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझी नियुक्ती मुंबई आवृत्तीच्या संपादकांनी केली.तेव्हा मला काम थांबवायच्या सूचनाही त्या पदावर आता असलेल्या श्री विनायक पात्रुडकर यांनीच देणे आवश्यक आहे.पण तसे झाले नाही तेव्हा मी नेमक्या कुणाच्या सुचना पाळायच्या ? माझे तीन महिन्याचे मानधन व वार्ताहर परिचय पत्राचे नूतनीकरण का केले जात नाही.ते का अडवून ठेवले? तेही कळत नाही.वार्ताहराचे वर्षातले काम असमाधानकारक असेल तर त्याचे काम थांबले जाईल अशा सूचनां परिचय पत्राच्या मागील बाजूला दिल्या आहेत.पण माझे काम असमाधानकारक आहे अशा प्रकारची
कोणतीही सुचना मला लोकमत कडून लेखी किंवा तोंडी मिळालेली नाही .उलट १५ एप्रिल पर्यंत माझ्या बातम्याही छापल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत माझ्याकडून ‘लोकमतला’कोणतेही ॅपकेज मिळालेले नाही म्हणूनच माझ्या बातम्या ‘रीराईट’कराव्या लागतात ,मला बातम्या लिहिता येत नाहीत असे टेनी यांनी आरोप केले आहेत असे मला वाटते. .माझे अक्षर खराब आहे (पण वाचनीय आहे.)त्यामुळे काहीशब्द –अक्षरे पुन्हा लिहावी लागतात,गेली ३०-३५ वर्षे मी वृत्तपत्र क्षेत्रात पूर्णवेळ काम केले.या काळात माझ्या असंख्य बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या कशा झाल्या ? का मी लोकमतला ‘पेडन्यूज’चे ॅपकेज दिले नाही म्हणून मला कमी करण्यासाठी श्री टेनीहा आरोप करीत आहे ते समजत नाही.
या बाबत मी नम्रपणे आपणास विनंती करतो की मी सध्या मेलनेच बातम्या पाठविल्या आहेत.त्या पाठविलेल्या बातम्या लोकमतच्या ठाणे कार्यालयात असतीलच ,त्या पहाव्या .प्रसिद्ध झालेल्या बातम्यात काय ‘रीराईट’केले? ते योग्य आहे का? तेही पहावे.
ठाणे येथे झालेल्या अ.भा..मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाच्यावेळी मी अंश कालीन वार्ताहर असूनही आपण स्वत:तसेच इतर सहकारी संपादकांनी मलाही या कार्यक्रमात विषय वाटून दिले होते ते बायलाइनने प्रसिद्ध झाले आहेत शिवाय ज्येष्ठ साहित्यिक वि .आ.बुवा ,शन्ना नवरे ,कल्याणाच्या नेत्रा साठे यांच्या निधनाच्या बातम्याही आपण पाहिल्या असतीलच ,त्याना गजानन दिवाण.विवेक गिरिधारी,यांनी चांगली पसंती दिली होती,त्या मीच केल्या होत्या हेही आपल्या नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो.
माझ्याकडे सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्या असल्याने झालेल्या कार्याक्रमाच्याच बातम्या मी पाठवितो. शिवाय होणारे कार्यक्रम ,पुस्तक प्रकाशाने,तिकीट लाऊन होणारे कार्यक्रम याना आपण प्रसिद्धी देत नाही,त्यामुळे बातम्यांची संख्याही मर्यादित असते हेही आपण लक्षात घ्यावे.
आपणावर विश्वास असल्याने तसेच आपणाकडून मला योग्य न्याय मिळेल या अपेक्षेनेच हे विस्तृत पत्र दिले आहे.उत्तराची अपेक्षा आहे.

आपला
(विनायक बेटावदकर)
माहितीसाठी प्रत
श्री.विनायक पात्रुडकर
श्री.नंदकुमार टेनी


 ..............................................
To,
श्री बेरक्या,
स.न.

अंश कालीन वार्ताहराला लोकमत कशी वागणूक देत आहे याचे माझेच उदाहरण आपणाकडे पाठवत आहे.मला मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा पत्रकारितेतून सामाजिक कार्य या बद्दलचा समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कारही मिळाला आहे.लोकमतला मी केवळ पेड न्युज दिल्या नाहीत म्हणून मला बातम्या लिहिता येत नाही म्हणून तोंडी सुचना देऊन घरचा रस्ता तर दाखवलाच पण जनेवारी ते एप्रिल ०१५ या काळातले मानधनही कोणतेही कारण न देता अडवून ठेवले आहे, मी सकाळ मधून निवृत्त झालो.गेली ३५ वर्षे मी पत्रकारितेशी संबधित आहे. याला आपण वाचा फोडू शकाल का?
 


(विनायक बेटावदकर)