दिव्य मराठीच्या पाच कर्मचा-यांच्या बदल्या...

अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती प्रचंड तोट्यात गेल्यामुळं भोपाळशेठ चांगलेच अडचणीत आले आहेत.त्यामुळं अनेकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे तर काही जणांच्या औरंगाबादला बदल्या करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद,नाशिक,जळगाव,सोलापूर नंतर भोपाळशेठने अकोल्यात पाय ठेवले आणि एक प्रकारचे ग्रहणच सुरू झाले.अभिलाष खांडेकर यांनी गरजेपेक्षा अधिक माणसांचा भरणा केला.नको ती माणसे घेतली आणि आता आवृत्ती तोट्यात गेल्यावर घेतलेली माणसे काढण्यात येत आहेत.काहींच्या आता औरंगाबादला बदल्या करण्यात आल्या आहेत.
अकोल्याचे बिपीन देशपांडे आणि विकास देशमुख,अमरावतीचे महेश घोराळे आणि नारायण भारती,नागपूरचे अतुल पेठकर यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.देशपांडे यास बीडला पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.तेथील मुकुंद कुलकर्णी एका महिेलेल्या छेडछाड प्रकरणात अडकल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे.कुलकर्णी यांची जागा देशपांडे घेतील.
महेश घोराळे यांना उस्मानाबादला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता,परंतु त्यांनी नकार दिल्याने त्यांना सध्या औरंगाबादेत समाविष्ठ करण्यात आलय.
अकोल्यात सिटी रिपोर्टर सचिन देशपांडे यांच्यावर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल झालाय.देशपांडे यांना वर्षभरापुर्वीच काढून टाकण्यात येणार होते,परंतु त्यांनी कोर्टात जाण्याची धमकी दिल्यामुळे तसेच त्यांच्यावर खासदार,आमदार आणि अनेक राजकीय लोकांचा वरदहस्त असल्यामुळं त्यांना कोणतेही काम न देता झुलवत ठेवण्यात आले होते.अखेर देशपांडेंना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
अकोल्यात कोणत्यावेळी काय होईल,हे सांगता येत नसल्यामुळे दिव्य मराठीचे सर्वच कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.निवासी संपादक सचिन काटे यांना तारेवरची करसत करावी लागत आहे.अकोल्यात लवकरच सकाळ सुरू होणार असून,काटे पुन्हा सकाळमध्ये जाण्याची शक्यता आहे.