गोंदियामध्ये महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये भलताच उद्योग

नागपूर - महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या गोंदिया कार्यालयाचे जिल्हा प्रतिनिधी कामापेक्षा सध्या भलत्यात प्रकरणात दंग आहेत.महिलांची बदनामी होईल,म्हणून आम्ही तो विषय येथे मांडला नाही,परंतु शेठजींनी गुप्त चौकशी केली तर त्याचा छडा नक्कीच लागेल.
नागपूरपासून केवळ दोन तासाच्या अंतरावर असलेल्या गोंदियामध्ये जिल्हा प्रतिनिधींचा उच्छाद सुरू असताना,छोटे बाबूजी आणि संपादकीय माणसे कसे काय गप्प आहेत,याचे सर्वांना नवल वाटत आहे.पानाचा दर्जा तर ढासळला आहेच,पण तालुका प्रतिनिधी आणि गावोगावच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्या कश्या दाबल्या जातात,कशी सेंटींग केली जाते,याबाबतचे पत्रच बेरक्याच्या हाती लागले आहे.
जिल्हा प्रतिनिधीचा हप्ता वरिष्ठांना तर पोहचत नाही ना,अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.