बेरक्याचा दणका : नव जागृतीच्या कर्मचा-यांना पगाराचे वाटप सुरू

बेरक्याच्या दणक्यानंतर नव जागृतीचे राज गायकवाड पुन्हा एकदा वठणीवर आले आहेत.मंगळवारी दुपारी त्यांनी पुण्यातील कल्याणीनगरमधील नव जागृतीच्या ऑफीसमध्ये कर्मचा-यांची बैठक घेवून,पगार देण्याबाबत विलंब झाल्याबद्दल माफी मागितली. चूक झाली आणि अशी चूक पुन्हा होणार नाही अशी  ग्वाही त्यांनी दिली. जे झाले ते विसरा आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी  केले  त्याचबरोबर यापुढे पगार ठरलेल्या तारखेला होतील,अशी ग्वाही दिली.

त्याचबरोबर खालील आश्वासने दिली...


१) कर्मचा-यांचा  मेअखेर पगार बुधवार आणि गुरूवार (दि.२२ आणि २३ जुलै)पर्यंत होतील.नाही झाल्यास पुन्हा विश्वास ठेवू नका...
(८० टक्के कर्मचा-यांना एप्रिलचा आणि ३० कर्मचा-यांना  मे चा पगार मिळालेला आहे)

२) जूनच्या पगाराबाबत कर्मचा-यांना पोस्ट डेटेड चेक वाटप करण्यात आले असूून,त्यावर १६ ऑगस्ट तारीख टाकण्यात आलेली आहे...

३) चॅनल १५ ऑगस्टपासून पुर्ववत सुरू होईल,ज्यांचा विश्वास आहे त्यांनी पुन्हा कामावर ज्वाईन व्हावे आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी राजीनामा देवून जुलैचा पोस्ट डेटेड चेक घेवून जावा...

> केवळ बेरक्याने कर्मचा-यांची पाठराखण केल्यामुळे कर्मचा-यांना मे अखेर पगार मिळाला आहे.हा कामगार एकजुटीचा आणि बेरक्याच्या बातम्यांचा दणका आहे.
- आता पाहू या पुढे काय होते ते...सर्व अपडेटस् आपणास पुन्हा मिळतीलच...