समीरण वाळवेकर यांची आगामी कांदबरी - '' शेळीचे कलम ४२०"


ज्येष्ठ पत्रकार आणि 'नव जागृती'त काही महिने सल्लागार संपादक महणून काम केलेले समीरण वाळवेकर यांची नवी कादंबरी 'शेळीचे कलम ४२०' लवकरच (अ)प्रकाशित होणार आहे...
त्यातील काही सारांश,त्यांच्याच फेसबुक वॉलवरून......

'' शेळीचे कलम ४२०"

आटपाट नगरी तील एका माणसाला कसे कोणास ठाऊक, पण "टी व्ही न्यूज चैनेल" काढायची दुर्बुद्धी सुचली !! 
तसे त्याने काढले सुद्धा ! 
त्यामुळे लोकांची बुबुळे कपाळात गेली ती अजून खाली आली नाहीत !!
परवाने नव्हते तर दुसर्या वाहिनीचा परवाना भाड्याने घेऊन काढले !
बालपणीचे चारपाच मित्र सुद्धा आपल्या मित्राचे हे अचाट साहस पाहून आपले काम धंदे नोकर्या सोडून त्याच्या चैनेल मध्ये रुजू झाले ! 
त्या सर्वांना त्याने संचालक, उपाध्यक्ष वगैरे करून टाकले !
पण हाय रे दैवा !! 
ते टी व्ही न्यूज चैनेल सहा महिन्यातच बंद पडले, कारण चार महिने कोणाचे पगारच झाले नाहीत !!
आता सध्या ते चारपाच मित्र ठार वेडे झाले आहेत म्हणे ! 
तेल गेले, तूप गेले, आधीच्या नोकर्या गेल्या,
आता तर बिनपगारी सहा महिने झाले ! करायचे काय ?
या मालक माणसाविरुद्ध आज पर्यंत न कोणती चौकशी झाली, न कोणी त्याला अटक केली !! 
कारण कोणाची अद्याप लेखी तक्रारच गेली नाही !!
त्या मालकाचा एकाच प्रोब्लेम होता , त्याला एक मानसिक आजार होता आणि आहे !! 
श्रीमंती थापा ठोकणे, कोटी कोटी च्या बाता थापा मारणे, भपका मिरवणे !! 
प्रत्यक्षात सारी बोंब !!
पण त्याची त्याला कल्पना नव्हती आणि नाही !! तो आपल्याच धुंदीत थापा लावतो, आणि रोज नवी गाजरे आपल्या कंपन्यान मधील कर्मचाऱ्यांना कामाला लावतो !!
ती ही मुकी बिचारी शेळ्या मेंढरे नोकरीच्या आशेने कामे करीत राहतात, चार चार महिने पगारा शिवाय !!
त्याला वाटते, की "शेळी " या विषयातील तो जागतिक तज्ञ आहे !!
या विषयावर त्याने महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याचे काही तास डोके खाल्ले आहे !! 
तो जो पळून गेला तो अजून सावरला नाही !!
त्या नंतर पण अनेक भोळ्या भाबड्या लोकांनी त्याच्या बोलबच्चनगिरी ला भाळून त्याच्या कडे काही कोटींच्या ठेवी सुद्धा ठेवल्या म्हणे !
तो सतत कोट्यावधी रुपयांच्या गोष्टी करतो ! त्याच्या काही वल्गना खालील प्रमाणे !!
"पाच हजाराचे अमुक महिन्यात पाच लाख देतो, अमुक वर्षात वीस लाख देतो" 
"कारण माझ्याकडे हजारो शेळ्या आहेत। प्रत्येक शेली मला २७ लाख रुपयांचे उत्पन्न देते"
""माझे रोजचे उत्पन्न तीन चार कोटींचे आहे !"
""मला चैनल वरून जाहिराती नकोत, रेस नको। दोनशे कोटी मी राखून ठेवले आहेत !""
""माझ्याकडे हजारो शेळ्या आहेत। प्रत्येक शेली मला २७ लाख रुपयांचे उत्पन्न देते ।!""
"लवकरच मी सांगलीचा साखर कारखाना विकत घेणार आहे !!"
""पाकिस्तान चे एक मटणाचे कंत्राट मला मिळाले आहे, त्यानंतर महिन्याला ६०० कोटी येणार आहेत !"
"सगळी देणी एक रकमी फेडतो , आणि परत चैनेल सुरु करतो !! आहे काय नाही काय !!"........वगैरे वगैरे।
खरी परिस्थिती अशी आहे, की यातील काहीच खरे नाही !! सारे मनाचे खेळ !!
यातील एकाही शेली , मेंढी कोणी कधी पहिली नाही !
या माणसाला हे कळात नाही, की आपल्याला आपण कोट्याधीश आहोत असे सतत वाटत राहणे, आणि प्रत्यक्षात तसे काहीच नसणे, हा एक मानसिक आजार आहे. त्याचे सारे मित्र त्याला हे सांगून ठाकले, की त्याला खरोखर मानसिक उपचार घेण्याची गरज आहे,, पण त्याला हे पटत नाही ! 
त्याच्या डोक्यात घोळ निर्माण झाला आहे.
आता त्याचे टी व्ही चैनेल बंद पडले आहे, 
कारण सुमारे सव्वाशे कर्मचार्यांचे सव्वा कोटी आणि 
इतर दोन कोटी अशी तीन कोटी रुपयांची देणी थकली आहेत।
शिवाय कित्येक कोटींच्या गरिबांकडून घेतलेल्या ठेवी वेगळ्या !! 
त्या ठेवीदारांचे तर फोन घेणे सुद्धा बंद केले आहे आहे !!
आता तो सर्व जवळच्या मित्रांवर खापर फोडतो आहे,
त्याला वाटते की सगळ्यांनी त्याला फसवले आहे…. सारे जग त्याच्या विरुध्द आहे ।
पण ८०० कोटी ची ओर्डेर पाकिस्तान मधून मिळाली की सारे कसे मस्त होणार आहे, असेच या स्वयंघोषित "सरकारांना" वाटते आहे !!
काही काळातच त्याची दुभंग ( स्कीझोफ्र्निक) मनोवस्था होणार आहे !! 
त्या अवस्थेच्या एक दोन टप्पे फक्त अलीकडची स्थिती आहे !!
आता मात्र वेळ आली आहे, सर्व कर्मचारी कायदेशीर कारवाई करून 
त्याला गजा आड करणार आहेत म्हणे !!
आता कुठे या कर्मचार्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये, पत्रकार आणि संबंधित कर्मचार्यांमध्ये नवी जागृती आली आहे !!
असो !! आली ना ? मग झाले तर !!
आता काही पत्रकार सुद्धा कामाला लागले आहेत, 
कारण त्यांना आता कुठे या प्रकरणात धासू स्टोरी दिसते आहे !!
काहींनी केंद्रातील एका खासदाराशी संपर्क केला आहे !! 
काहीतरी होऊन आपले पगाराचे थकीत पैसे परत मिळतील अशे सार्यांना आशा आहे !!
अर्थात त्या आधी "तो" परदेशात पळून गेला नाही तर !! 
____________________________________________________
वरील सर्व आशय आणि मजकूर माझ्या येऊ घातलेल्या " शेळीचे कलम ४२०" या नव्या कादंबरीच्या सारांशा मधील असून 
त्याचा प्रत्यक्षातील अथवा वास्तवातील कोणाशीही संबंध किंवा साधर्म्य असल्यास , 
तो निव्वळ योगायोग असेलच किंवा कसे, हे सांगता येणार नाही !!
शिवाय या कादंबरीचे काही सिक्वेल्स येणारच नाहीत असे सांगता येणार नाही !
कारण "शेळी मालका" च्या जागी "म्हशी मालक", "इमारत कंत्राटदार", "शेतकरी", "कोंबडी चालक",ल "गुंठा मंत्री " वगैरेंनी सुद्धा हेच , असेच टी व्ही चैनेल काढायचे प्रयोग यशस्वी केल्याचे हल्ली अनेक मोठे सल्लागार संपादक, पत्रकार छातीठोक पणे अभिमानाने आणि रोज चर्चांमध्ये मध्ये झळकत सांगत आणि मिरवत असतात म्हणे !!
त्यामुळे माझी दुसरी कादंबरी प्रकाशित होईपर्यंत आता मी काहीच बोलणार नाही किंवा लिहिणार नाही !!त्या साठी ती प्रकाशित झाल्यावर 
ती विकत घेऊनच वाचावे लागेल !!
इति अलम !!