जानेवारी महिन्यात झी 24 तास वृत्तवाहिनीने पुण्यातील सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील “रानडे”च्या इमारतीत कॅम्पस मुलाखती घेतल्या. DNA व ZEE 24 आणि एका संकेतस्थळासाठी सुमारे शंभर-एक पत्राकारितेच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दिल्या. या तिनही ग्रुपना झी समुहाने कॅम्पसमधे आणले होते. प्रथम तिनही माध्यमासाठी स्वतंत्र मुलाखती घेतल्या. त्यानंतर एकत्रितपणे झी 24 तास साठी साठी ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून विद्यार्थी निवडले. (ही निवड सात मिनीटात उरकली, सात जणांच्या ग्रुपमधून जो जास्त आणि आक्रामक बोलेल त्याची निवड (?) पक्की) अशा मुल्यांकनावरुन निवडलेल्यांची लेखी घेण्यात आली. चार ग्रुप मधे सदर लेखी परिक्षा घेण्यात आली. रानडे इंन्स्टिट्यूटच्या इमारतीत झालेल्या या कॅम्पसमधे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठवाडा मित्र मंडळ, गरवारे महाविद्यालय येथील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते. सदर कॅम्पस उरकून संस्थेची लोकं “कळवतो” म्हणत निघून गेली.
सुमारे दोन आठवड्यानंतर फक्त झी 24 च्या टीमने त्या चारही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना मुंबई कार्यालयात बोलावले. (बाकी दोन संस्थेची एच आर टीम अजूनही जॉब संदर्भात थांगपत्ता लागू देईनात) मुलाखत घेणारे संपादक कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना टाईमपास म्हणून कार्यालयातील टीव्ही दाखवून न्यूज स्टोरी लिहण्यास सांगण्यात आले. डॉ. येताच सर्वांना जेवणाच्या टेबलावर डॉक्टरसोबत बसवण्यात आले. जेवता-जेवता अनौपचारिक गप्पा डॉक्टरांनी सुरु केल्या. या गप्पा सुमारे पाच तास चालल्या. त्यानंतर सर्वांना घरी जाण्यास सांगितले.
“तुमची फायनल मुलाखत घेण्यात आली असून त्यात सुमारे दीडशे विषय आपण घेतले आहेत. यावर आधारित तुमची निवड होईल, तुम्हाला लवकरच एच आर कडून लवकर कळवण्यात येईल.” हे ऐकून विद्यार्थी जाम वैतागले. ही कसली मुलाखतीची पद्धत म्हणत स्वत:वरच रागवत व मनस्ताप करत, कुंठत विद्यार्थी पुण्याकडे निघून आले.
विद्यार्थी नोकरीसाठी कॉल येईल म्हणून कॉल लेटरची वाट पाहू लागले. या घटनेला आज सुमारे आठ महिने उलटून गेले आहेत. विद्यार्थी अजुनही “झी 24 तास”चे कॉल लेटर येईल या आशेवर बसले आहेत. मात्र ‘झी समुहा’कडून या संदर्भात काहीच कळविण्यात आले नाही. विचराणा केली असता कसलीच माहिती एच आर वाले देत नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. रानडेच्या वरीष्ठाकडून कळविण्यात आले आहे की, किमान झी समुहाकडून काहीतरी कळवणे बाध्य होते. ‘झी’ने असे न करता विद्यार्थ्यांसोबत दगाबाजी नव्हती करायला पाहिजे होती. असा प्रकार ‘रानडे’च्या इतिहासात प्रथमच असे घडला आहे. याबाबत मुलाखती देणारे विद्यार्थी म्हणतात की, “झी समुहा”ला मनुष्यबळासाठी पुणे प्रतिबंधीत करावे. आमच्या बेरोजगारीची थट्टा झी समुहाने केली आहे.