खरं तर बाईचं वय आणि वृत्तपत्राचा खप विचारू नये.परंतु आमचाच खप कसा सर्वाधिक आहे,हे पटवून देण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रे करत असतात.
कोल्हापुरात लोकमतचा खप अवघा 30 हजार असताना,1 लाख 68 हजार वाचक संख्या दाखवून 'कोल्हापुरात लोकमतच खरा पुढारी' अशी जाहिरात करून लोकमतने पुढारीला खिजवले.त्यानंतर पुढारीने खरी आकडेवारी दाखवून लोकमतचा खरा चेहरा उघड केला.
खरं तर वृत्तपत्राचा नेमका खप किती आहे, हे फक्त ऑडिट ब्युरो सर्क्युलेशनवरून कळते.कोणत्या तरी आलतू फालतू एजन्सीचा सर्व्हे ग्राह्य धरला जात नाही.कोणी तरी हंसा रिसर्चवरून लोकमतने हा आगावूपणा केला आणि तो त्यांच्या अंगलट आला.मुळात स्कीमची आकडेवारी ऑडिट ब्युरो सर्क्युलेशन पकडत नाही.त्यामुळंच लोकमत,दिव्य आणि महाराष्ट्र टाइम्स मार खात आहे.स्कीम संपली की यांचा खप कमी होतो आणि पुन्हा तोंडावर आपटतात.ऑडिट ब्युरो सर्क्युलेशनचे सदस्य वर्षभरात केव्हाही अचानक प्रिटींग युनिटला भेट देतात,तेव्हा खरा खप किती आहे,हे उघड होतो.
तेव्हा अश्या किती हंसा आल्या तरी त्याचे हासेच होणार आहे....
...............
कोल्हापुरात लोकमतचे जनरल मँनेजर मकरंद देशमुख आणि कार्यकारी संपादक वसंत भोसले दर्डाशेठला अडचणीत आणणार...
दर्डाशेठ तुम्ही कोल्हापुरात सहा सहा महिने जात नाही,
त्यामुळे 'देशमुखी' थाट सुरू आहे आणि 'वसंत' काही फुलतच नाही...
.............
कोल्हापूर म.टा.ला गळती सुरूच...दीपक शिंदे यांचा राजीनामा...एकूण तीन पदे रिक्त...
.............
कोल्हापूर पुण्यनगरीला अद्याप कार्यकारी संपादक मिळाला नाही...
............
आयबीएन आणि लोकमतची भागिदारी डिसेंबर २०१५ मध्ये संपणार आहे.आयबीएनची मालकी आता मुकेश अंबानी यांच्याकडे आहे आणि अंबानी हे दर्डाशेठबरोबर पुन्हा करार करण्यास तयार नाहीत,असे वृत्त आहे.
दर्डाशेठ निखिल वागळे यांना घेवून स्वतंत्र चॅनल काढणार आहेत,अशी मध्यंंतरी चर्चा होती.परंतु वागळे स्वत: महाराष्ट्र १ काढत असल्यामुळं आता दर्डा शेठचे पुढे कसे होणार,याबाबत चर्चा सुरू आहे...
सध्या तरी दर्डा शेठच्या चॅनलबाबत काहीच हालचाली नाहीत,त्यामुळं आयबीएन आणि लोकमत यांच्या भागिदारीचे नेमके काय होणार,याकडं लक्ष वेधलय.
....................
बेरक्याचे भाकीत खरे ठरले...आयबीएन लोकमतचा दिल्ली प्रतिनिधी अमेय तिरोडकर यांचा आयबीएन - लोकमतला रामराम...निखिल वागळे यांच्या महाराष्ट्र 1 ला जॉईन होणार...
....................
नागपूर - बाळ कुलकर्णी गेल्यापासून पुण्यनगरीला अद्याप वारसदार मिळाला नाही...
सचिन काटें यांचा नकार...
आता कोणता 'वीर' मिळणार ?