वाहिन्यांना पत्रकार हवे आहेत की रोजंदारीने काम करणारे तरुण ?

अनुभव कथन -3
मोठ्या मोठ्याने बोलून आपल मत ठामपणे मांडणारे महाराष्ट्रातील मोठ्ठे मराठी पत्रकार निखील वागळे यांनी आपल्या वाहिनीसाठी ३ दिवस डी.टी.सी. इमारतीमध्ये तीन मुलाखतीचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. तीन दिवस उमेदवारांच्या रंगाच्यारांगा लागल्या, जेव्हा याची जाहिरात वाचायला मिळाली त्यात कुठेही कोणत्या पदासाठी ,कोणासाठी म्हणजे स्थानिकांसाठी की बाहेरगावाच्यांसाठी,पत्रकार हवेत म्हणजे फिल्ड मध्ये काम करणारे की डेस्क वर असा कुठलाही उल्लेख नव्हता .त्यातल्या त्यात पत्त्यात कुठला एरिया येतो म्हणजे लोअर परेल असा उल्लेख नव्हता.यामध्ये सर्वात जास्ती मनस्ताप बाहेर गावाच्या उमेदवारांना झाला .
या मुलाखतीमध्ये स्थानिकांचाच जास्त भरणा होता .त्यांच्या जोरावरच मुलाखतीला प्रचंड गर्दी असे सांगण्यात आले यातले बोटावर मोजण्या इतके पत्रकार सोडता बाकी सर्व जनसंवाद विभागाचे विद्यार्थी होते. त्यामुळे यातील बहुतेकांना फुकट ६ ,४, महिने काम करा असे सांगण्यात आले .
मी मुलाखतीच्या दुसर्या दिवशी पोहचलो .बाहेरगावचा असल्याने पहिल्यांदा तर एवढी गर्दी पाहून कुठे आलो अस वाटल.इमारतीचा पत्ता शोधण्यासाठी आधीच १५ तास प्रवासात गेले असताना ही इमारत शोधत एक तास पायी चालत आलो .प्रचंड गर्दी बघून मन खिन्न झाल त्यातल्या त्यात हे ऑफीस म्हणजे कोंडवडा.एवढी मोठी रांग त्यात अजिबात हवा नाही पाणी तर नाहीच पण बाथरूम सुद्धा नव्हत .
एवढी गर्दी पाहून मन खिन्न झाल पण नंतर समोर गेल्यावर विनायक गायकवाड नावाच्या मुलाने बाहेरगावाचा असल्याने घेतो लवकर म्हणून अर्जावर एस अस लिहून दिल.एवढ्या उकाड्यात दोनच पंखे होते ते दोनही पंखे विनायकाच्याजवळ होते बाकी सगळे हात हलवत होते .यातही ज्या सुंदरी anchor साठी आल्या होत्या त्यांच्या मेकअपचा ब्यांड वाजला म्हणून आधीच अस्वथ होत्या .त्यात ३ तास वाट बघितल्यानंतर माझा नंबर लागला .ज्यांच्या अर्जावर एस अस लिहील होत त्यांची मुलाखत दीप्ती राउत या बाई घेत होत्या..
घामाघूम असलेला मी आत गेलो आत कोणी साध पाणी पण विचारलं नाही ..वागळेच्या शिलेदाराना साध पाणी पण उमेदवारांना पुरवता आल नाही .आत केबिन मध्ये गेलो म्याडम ए सी मध्ये बसून आत गेल्यावर वाटल इथेच आराम करावा इतक आरामदायी ठिकाण ! म्याडमनी सी.वी. बघितला आणि ५ मिनिटात तुम्ही आवड म्हणून आले का या क्षेत्रात ..तुमच्या कडली कोणती बातमी द्याल असे प्रश्न विचारले पण बोलू फारसे दिले नाही मग तुम्ही stringer म्हणून काम कराल की पत्रकार म्हणून हा प्रश्न विचारला सरला बाईंचा interview ..
जर यांना अंशकालीन काम करणारे लोक हवे होते ते यांना सी वी वरून भेटले असते त्यासाठी मुलाखतीचा घाट घालण्याची मुळीच गरज नव्हती .स्थानिकांना फुकट काम करा आणि बाहेरच्यांनी अंशकालीन, मग मुलाखती घेतल्याच कशाला? एवढी गर्दी एवढा प्रवास सार फुकट गेल अस वाटायला लागल ..म्हणजे नव्या वाहिनीला प्रचंड लोक काम करण्यासाठी उत्सुक आहेत अस चित्र वागळे यांना तयार करायचं होत .सगळ्यांना एक संधी हवी असते वागळे साहेब ती जर तुम्हाला आय.बी.एन. या वाहिनीने दिली नसती तर तुम्हालाही लोक ओळखत होते पण आमच्यासारख्या तरुणात तुम्ही लोकप्रिय झाले नसते ..
जाता जाता गायकवाडचा आवाज ऐकू आला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम संपला रांगेत असणार्यांना टोकन देण्यात येईल त्यानी उद्या यावे .मी म्हंटल कोपरापासून नमस्कार..
मनात अनेक विचार येत होते पत्रकारिता करिअर म्हणून निवडून चूक केली का? घरी काय सांगू ? असे अनेक प्रश्न एवढ्या दुरून आलो न जेवता काही खातापिता सरळ मुलाखतीसाठी आलो पण निराश झालो तुम्ही निवडल्या गेले की नाही हे कधी सांगणार हे पण सांगितलं नाही . 
वगळेनी आपला पूर्ण पगारी स्टाफ आधीच निवडला होता आता फुकट काम करण्यासाठी त्यानी हा तीन दिवसीय मुलाखतीचा कार्यक्रम पार पाडला .आमच्यासारख्या तरुणांमध्ये क्रेझ असणाऱ्या वागळेसाहेबानी रोजंदारीवर काम करणारे तरुण हवे अशी जाहिरात द्यायला हवी होती .
पण असो त्यांना आजचा हा आमचा सवाल कोण विचारणार ???

- विदर्भातील एक तरुण