काही तरी 'प्रसन्न' करा रे....

काही असो,जय महाराष्ट्रचे मालक प्रयोगशील दिसताहेत.त्यांनी समीरण वाळवेकर,प्रसन्न जोशी आणि निलेश खरे असे पट्टीचे सेनापती घेवून चॅनलचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.आता मेगा भरती इव्हेंट काढला आहे.अनेक पदे भरण्यात येणार आहेत,त्याचबरोबर दिल्लीसह राज्यातील मेट्रो सिटी मध्ये ब्युरोही नियुक्त करण्यात येणार आहेत.
नाशिकचे ब्युरो चीफ प्रशांत बाग याने स्वत:हून राजीनामा देवून आयबीएन - लोकमतची वाट धरली आहे.नागपूरच्या ब्युरोला मात्र नारळ देण्यात आलाय.कोल्हापूर आणि पुणे बाबत अधिकृत माहिती नाही.
एकीकडे माणसे काढायची आणि नंतर पुन्हा माणसे भरती करायची ही जय महाराष्ट्रची जुनी खोड आहे.यांचा कोणावरही विश्वास नाही.आहे त्या माणसांना तयार केले आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला तर ते संधीचे सोने केले असते,पण इथे सर्व अविश्वासाचे वातावरण आहे.
नविन साहेब आला की तो त्याच्या स्टाईलने काम करतो.मंदार फणसे,रविंद्र आंबेकर,तुळशीदास भोईटे गेल्यांनंतर शैलेश लांबे आले.त्यांनी आणि आनंद गायकवाड यांनी चॅनलचे पार वाटोळे केले.नंतर आलेल्या विलास आठवले यांनी चॅनलला पुर्व पदावर आणले पण पुन्हा त्यांच्या डोक्यावर एक नव्हे तर तीन माणसे आणली.आता चॅनलमध्ये असे वातावरण करून ठेवले आहे की विलास आठवले यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा.त्यांचा रात्रीचा लक्षवेधी काढून घेण्यात आला.कोणतीही बातमी आली की हे नको,ते नको म्हणून आठवलेंना सांगितले जाते.बिचारे आठवले काय करणार ? त्यांना गप्प गुमान एक तर काम करावे लागेल नाही तर राजीनामा देवून दुसरे चॅनल शोधावे लागेल.तसे विलासचेही बरेच काही चुकले म्हणा.त्यांना राम कदम यांचा पंगा खूपच महागात पडला.राम कदमांनीच आठवलेंचा गेम केल्याची चर्चा आहे.
असो,निखिल वागळेंच्या चॅनलकडून पुरता भ्रमनिरास झाल्यानंतर अनेकांना आता जय महाराष्ट्र ऑप्शन दिसू लागले आहे.
पण भरती केल्यानंतर कोणाला काढणार नाहीत आणि कोणावर अन्याय होणार नाही,याची खात्री कोण देईल का ?
जय महाराष्ट्रमध्ये आता कर्मचा-यांना विश्वास देण्याची गरज आहे.असा विश्वास मिळाला तरच चॅनल नक्कीच स्पर्धेत येईल नाही तर असे किती आले आणि गेले पण चॅनल आहे तिथचं असा संदेश जाईल...
काही तरी 'प्रसन्न' करा रे....