वागळे यांच्या चॅनलला अखेर 'फायनान्सर' मिळाला


आयबीएन - लोकमतला लवकरच 'खिंडार'...!
मुंबई - निखिल वागळे यांच्या चॅनलला अखेर फायनान्सर मिळाला आहे.त्यामुळे नव्या वर्षात वागळे यांचे चॅनल सुरू होणार,हे शंभर टक्के सत्य आहे.बेरक्याने सर्व बाबींची चौकशी आणि तपासणी केल्यानंतरच हे भाष्य केले आहे.
निखिल वागळे यांनी गेल्या महिन्यात स्वत: Tweet करून चॅनल सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.मेल आय.डी.देवून अर्जही मागवले होते.तेव्हा बेरक्याकडे विचारणा करणारे अनेक मेसेस आणि मेल येत होते.परंतु त्यांना त्यावेळी फायनान्सर मिळाला नसल्याने ते सुरू होईल की नाही,याबाबत साशंकता होती.
मात्र आताच आलेल्या माहितीनुसार,वागळे यांचे चॅनल सुरू होणार,हे शंभर टक्के सत्य आहे.कारण त्यांना तीन फायनान्सर मिळाले आहेत.
दुसरीकडे वागळेंच्या प्रस्तावित चॅनलचा सर्वात मोठा फटका 'आयबीएन - लोकमत'ला बसणार आहे.आशिष जाधव अगोदरच वागळेंच्या गोटात गेले आहेत.आता विनायक गायकवाड,गणेश मोरे,शरद बडे,
अजय परचुरे दिल्लीचा रिपोर्टर अमय तिरोडकर,पुण्याची रिपोर्टर प्राची कुलकर्णी यांच्यासह सात जण वागळे यांचे चॅनल जॉईन  करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.ते येत्या दोन दिवसांत राजीनामा देणार आहेत.
एकीकडे वागळेंच्या चॅनलमुळे आयबीएन- लोकमतला मोठा धक्का बसणार असताना,सुंटीवाचून खोकला जात आहे,असे सांगितले जात आहे.
आयबीएन - लोकमत नंतर सर्वात मोठा फटका टीव्ही ९ ला बसणार आहे.तेथे प्रिती सोमपुरा आणि गजानन कदम यांच्या एकाधिकारशाहीमुळे अनेकजण नाराज आहेत.तेथे नाराज सर्व वागळेंच्या चॅनलला जाणार आहेत.वागळे यांच्या चॅनलकरिता अर्ज करणा-यामध्ये सर्वात जास्त आयबीएन लोकमत,टीव्ही ९ चे कर्मचारी जास्त आहेत.आणि वागळेही या दोन चॅनलमधीलच कर्मचारी फोडणार आहेत,अशी माहिती आहे.
वागळे यांच्या चॅनलचे नाव 'महाराष्ट्र नंबर १' असे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वागळे यांच्या चॅनलमध्ये वागळे स्वत: सर्व पदाकरिता मुलाखती घेवून निवड करणार आहेत.१५ ऑगस्टपासून मुलाखती सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
असो,वागळे यांच्या चॅनलला 'बेरक्या'च्या शुभेच्छा...
अधिक माहिती वेळोवेळी देवूच...