जेव्हा निखिल वागळे 'आयबीएन -लोकमत' सोडून गेले,तेव्हा पहिल्यांदा महेश म्हात्रे आणि नंतर मंदार फणसे यांची वर्णी लागली.त्यानंतर हा याचा समर्थक आणि हा त्याचा समर्थक हे शितयुध्द सुरू झाले.मंदार फणसे यांनी बाबा फूंदे,अमित मोडक आणि विनोद राऊत या बगलबच्चांना जवळ केल्याने निखिल वागळे समर्थक आणि मंदार फणसे समर्थक यांच्यात टोकाचे मतभेद सुरू झाले.त्यातून चॅनलची अधोगती सुरू झाली.त्यामुळे चॅनलचा टीआरपी आपोआप घसरू लागला.रात्री 9 वाजता होणारा डिबेट शो 'आँ... ऑ...आँ'...यामुळे कोणी पहात नाही.त्यामुळे नंबर एकबरोबर स्पर्धा करणारे चॅनल चौथ्या क्रमांकावर गेले.
त्यात आता आठ वर्षापासून काम करणारे अनुभवी अनेक कर्मचारी राजीनामा देवून निखिल वागळे यांच्या चॅनलकडे जात असल्यामुळे चॅनलच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
आता चॅनलमध्ये महेंद्र मोरे आणि रणधिर कांबळे यांची वर्णी लागणार असल्यामुळे आयबीएनच्या निष्ठावंत कर्मचा-यांत असंतोष निर्माण झालाय.त्यामुळं त्यांची चलबिचल सुरू झाली आहे.
दुसरीकडे आयबीएन - लोकमतमध्ये कालपासून हडकंप माजल्यामुळे मंदार फणसे यांचा रक्तदाब अचानक वाढला आहे.त्यामुळे त्यांनी शुक्रवारी सुट्टी घेतली आहे.तर कार्यकारी संपादक महेश म्हात्रे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर असल्यामुळे टांगा पलटी घोडा फरार असे एकंदरीत चित्र आहे.

निखिल वागळे यांच्या चॅनलचे ऑफरलेटर जसे जसे मिळतील तसे आयबीएन -लोकमतमध्ये आणखी गळती सुरू होईल.गुरूवारी नेटवर्क ११ चे अध्यक्ष उमेश उपाध्याय यांनी दिवसभरात वेगवेगळ्या तीन मिटींगा घेतल्या.ज्यांना जायाचे असेल त्यांनी खुशाल जावे,पण ज्यांना थांबायचे आहे,त्यांचे प्रश्न सोडवतो,असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.मात्र अनेक कर्मचा-यांनी मंदार फणसे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने वरिष्ठ मंदार फणसेंवर नाराज झाले आहेत.
मंदार फणसे यांची पुर्वी जी क्रेझ होती,ती आता संपुष्टात आली आहे.एक टीम लीडर म्हणून ते सपशेल अयशस्वी ठरले आहेत.चॅनलचा टीआरपी असाच घसरत राहिल्यास फणसे यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आयबीएन - लोकमतमध्ये येण्यास एक पाऊल मागेचे डॉक्टर गुडगुडकर आणि जय महाराष्ट्रमध्ये आताच कार्यकारी संपादक झालेले आणि नेहमी प्रसन्न असलेले इच्छुक असल्याची चर्चा पसरली आहे.