पुरोगामी
चॅनलची नवी सुरूवात करतानाच,
चॅनलच्या
मालकांनी सनातनी शुभारंभ
केल्याने मुख्य संपादक जबरदस्त
चिडले आहेत. नवी
इंग्निंज सुरू करण्याच्या
पूर्वी आता काढता पाय घेण्याच्या
तयारीत मुख्य संपादक असल्याची
चर्चा सध्या मुंबईतील पत्रकार
वर्तुळात रंगत आहे.
वागळेंच्या
या चॅनलमध्ये जास्तीत जास्त
डिबेट शो होणार असे ठरले.
तेही
वागळेच घेणार असल्याने,
यापुढे
प्रतिगामी व्हायचे की पुरोगामी
या विचारात अडकले गेले आहेत.
नवीन
टॉक शो करताना आता महाराष्ट्राचे
पुरोगामित्व मांडू की मालकाचा
सनातनी थाट यावर वागळे विचार
मंथन करताना दिसतात.
त्यामुळे
त्यांची चिडचिड खूप वाढली
आहे.
याची
प्रचिती आणि प्रसाद सत्यनारायणाने
श्रीगणेशा झाल्याने नव्या
टिमला मिळत आहे.
वागळे
६ महिन्यातच येथून बाहेर
निघतील अशी पक्की खबर आहे.
मात्र
खात्रीलायक सुत्रानुसार
त्यापूर्वीच येथील महाराष्ट्र
१ चे खातेप्रमुख राजीनामा
सुरू करतील. त्यामुळे
मुंबईच्या मंडळाला चान्स
दिला असता तर डेक्सला चांगली
माणसे मिळाली असती.
तिकडे
काश्यपच्या साथीला कुणी तगडा
गडी नसल्याने काश्यपचा मुड
ऑफ झाला आहे. तर
डेक्सवरच्या नवख्यांनी आता
इतर संधी चाचपण्याच्या हालचाली
सुरू केल्या आहेत.
पुण्याची
टीम मुंबईत स्थिरावतानाच
येथील नवी मुंबईत ठाण्यात
घरे शोधत आहे.
मात्र
घराचे भाडे,
इतर
खर्च परवडतील असा पगार मिळाला
नसल्याने त्यांचीही मोठी
दमछाक होत आहे.
त्यामुळे
सगळेच अवस्थ असून सत्यनारायण
पावला की कोपला यावर रोज नवा
टॉक टाईम सुरू झाला आहे.