मी मराठी अपडेट

आताच 15 आणि 16 सप्टेंबरला मी मराठीने तब्बल 82 जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये किती जण निवडणार ते मात्र निश्चित नसले तरी त्यांची पगाराची मर्यादा निश्चित झाली आहे. निवड झालेल्यांना 7500 हजारांपेक्षा एकही रुपया जास्त मिळाणार नसल्याचे संपादकांच्या वॉर रूम मध्ये निश्चित झाले आहे. बरेच चेहरे हे नवखे आणि मुंबई बाहेरचे होते. त्यामुळे सगळेच जण मी मराठीच्या कार्यालयात 1 वाजता पोहचले होते. त्यावेळी रिशेप्शनिष्ट आणि सिक्युरिटीवर असलेल्या दोघी महिलांची एकच तारांबळ उडाली. काय सांगावे काय करावे याचा कुणासही मागमूग नव्हता. थोडं थांबा थोडं थांबा.. असं सागून तब्बल 2 तासांनंतर मुलाखत सुरू झाली. त्यात प्रश्नपत्रिकाही सोडवायची अट होती. यामध्ये, तुम्ही पत्रकारीतेत का येऊ इच्छिता?, पत्रकारीतेत कोणते गुण महत्त्वाचे ? तुमच्यातील उणिवा कोणत्या? राष्ट्रवादीचे जेल भरो आंदोलन/शिना बोरा हत्या कांड/कॅलेडर गर्ल या पैकी एका विषयावर १० ओळी लिहा. आणि इको फ्रेडंली गणेशोत्सवावरील पॅराग्राफचे भाषांतर करा. अशा प्रश्नाच्या सरबत्तीने सगळे गोंधळून गेले. त्यातच बसायल आणि उभ रायला जागा नसल्याने , स्टेअर केसवर बसून, अडगळीत टाकलेल्या लाकडी खोक्यांवर बसून तर कुणी उभेच राहून ते प्रश्न सोडवले. पण मी मराठी कडून मुलाखतीत चांगली उत्तरे काही मिळाली नाहीत. तर आता तर त्यांना बोलावणे आले तर जॉईन करायचे की नाहीच हा प्रश्न पडलाय!