मुंबई - बेळगाव तरुण भारत च्या रिपोर्टर पूनम अपराज यांनी, लालबागच्या राजाच्या दर्शनाला लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून चित्रीकरण करताना पोलिसांनी धक्काबुक्की करून पोलीस चौकीत डांबून ठेवले, इतकेच काय तर १२०० रुपये दंड वसूल केला,त्यामुळे पत्रकार संतप्त झाले असून याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे
पूनम अपराज शुक्रवारी रात्री लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेत पोलीस कर्मचारी त्यांच्या सहकार्यांना रांगेत घुसवत होते, तर गणेशभक्तांना अटकाव करीत होते. हे दृश्य मोबाईलवरून पूनम अपराज या चित्रीत करीत होत्या. त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी अपराज यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर अपराज यांना लालबागच्या पोलीस चौकीत नेऊन डांबून ठेवले. त्यांच्याकडून १२00 रुपये दंड वसूल करून त्यांची सुटका केल्याचा आरोप अपराज यांनी केला आहे.