फुकट चिकन खाणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे


मुंबई - "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच" हे टिळकाचं वाक्य आता कालबाह्य झालय.आता 'फुकट चिकन खाणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' असं वाक्य ऐकावयास मिळाल्यास नवल वाटू देवू नका.
असाच किस्सा घडला आहे,थेट, अचूक आणि बिनधास्त चॅनेलमध्ये … येथे वरिष्ठ पदावरील साहेबांना फुकटात जेवण मिळतं आणि रविवारी नॉन-व्हेज दिलं जातं, तेही फुकट. रविवारी तसंही काही काम नसतं. दुपारी एकच्या सुमारास समीकरण जुळवणार्या संपादकास भूक लागली. रविवार म्हटल्यावर त्यांचा नॉन-व्हेजचा मुड होता. ते पण श्रावण महिन्यात, मात्र कॅन्टिनमध्ये चिकनच नव्हतं.संपादकांनी मग कॅन्टीन डोक्यावर घेतलं. कॅन्टीनवाल्याची त्रेधातिरपीट उडाली. एचआरलाही दखल घ्यावी लागली. वरपर्यंत प्रकरण पोहोचलं.असं फुकट चिकनखाऊ संपादक असल्यावर चॅनेल किती प्रगती करेल, याचा अंदाज आता तुम्हीच लावा.