शेट्टींना 'त्रिदेव' चुना लावणार....

'थेट, अचूक आणि बिनधास्त' चॅनलची घडी बसवण्यासाठी आणलेल्या तीन 'दिव्य' संपादकांनी महिन्यात चॅनलची वाट लावली आहे. कर्मचा-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी वाढलीय...दोन तीन जणांनी त्यांच्या नावाचा टीळा लावलाय. त्यांच्यावर 'प्रसन्न' मेहरबान आहे. चार - पाच जणांना तर राजीनामा द्या,नाहीतर काढून टाकू अशी धमकीच त्या 'चिकन खाऊ फुकट्या 'वाळवी'नं दिलीय...आहे ते लोक काढायचे आणि आपले 'जात'भाई भरायचा डाव 'वाळवी'च्या मदतीनं 'प्रसन्न'वाले करत आहे. एका 'चमच्या'ला अँकरींगची जहागिरी बहाल केली. पनवेलचा 'चंदन'ही दरवळू लागलाय...'बदलापूरच्या वाघा'ची काम करुनच दमछाक होऊ लागलीय. पण बिचारा करणार काय....? राजीनामा देण्यास ज्यांना सांगितलं त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिलाय...या 'त्रिकुटा'चे प्रताप मोठ्या 'अण्णा' पर्यंत पोहोचलेत. अण्णा या 'त्रिकुटा'वर प्रचंड नाराज आहेत. धाकटे शेट्टीही 'त्या' कर्मचा-यांना भक्कम पाठिंबा देत थोडं थांबा असं सांगितलं...चॅनलचा टीआरपी पार आपटलाय आणि स्वत:चा जम बसवून शेट्टीचं दुकान बंद करण्याचा विडाच या 'त्रिदेव' संपादकांनी उचललाय. वाळवीला मीडियात काळं कुत्रं विचारत नाही, बीजेपी माझामधून मोठ्या थाटात आलेलं 'प्रसन्न पार्सल'ही काही दिव्य करु शकलेलं नाही.आता शेट्टी अण्णा काय निर्णय घेतात यावरच चॅनलचं भवितव्य आहे.