पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून शहरात आपला
दबदबा कायम ठेवण्यासाठी मोठ्या पवाराने धाकल्याला पुढ करत गेल्या काही
दिवसांपासून राडा घालण्यास सुरवात केली. मात्र, मोठ्या पवारची खेळी अयशस्वी
ठरल्याने धाकल्याला कपडे फाटे पर्यन्त मार खावा लागला. एवढ सगळ होऊन ही
मोठ्या पवाराचा माज कमी झाला नाही. मात्र तो तोंडावर पडला हे नक्की.
पत्रकार संघाची निवडणूक झाल्यास आपल्या हाती काही राहणार नाही
या चिंतेतच मोठा पवार गेल्या महिन्यापासून 'पॉवर' गेम करण्यात मग्न होता.
२०१३ साली देखील त्याने खेळी करत हवश्या-नवश्यांना पुढ करून निवडणूक
बिनविरोध काढली होती. तेव्हाच्या कार्यकारिणीची ही त्याला धास्ती होती.
मात्र, ही धास्ती अवघ्या काही महिन्यात उतरली.
कारण २०१३ च्या लोकांनी विशेष असे काही केले नाही. आणि
त्यांचा त्रासपण मोठ्या पवाराला म्हणावा तसा झाला नाही. पण गेल्या
महिन्यापासून निवडणूक लागली आणि गेमा टाकत धाकल्या पवाराला मोठ्याने
लोकांच्या अंगावर सोडल.
15 तारखेला पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या द्विवार्षिक
निवडणुकीत या दोन्ही पवारांनी आपली पायरी सोडली आणि जेष्ठांच्या अंगावर हात
टाकले.
मटाचे सुनिल लांडगे आणि लोकमतचे संजय माने या दोघांचे पॅनल
निवडणुकीच्या रिंगणात होते. लांडगे यांच्या पॅनेल मध्ये उपाध्यक्ष पदासाठी
अनिल कातळे (एमपीएसी न्युज), दिलिप कांबले (साम मराठी) सरचिटणीस पदासाठी
अमोल येलमार(पुढारी),सचिव पदासाठी गोविंद वाकडे(आयबीएन लोकमत), प्रसाद
गोसावी (जनशक्ती) खजिनदार पदासाठी संदेश पुजारी (पवना समाचार) यांचा तर
माने यांच्या पॅनेल मध्ये उपाध्यक्ष पदासाठी संतलाल यादव (सिद्धांत समाचार
),सरचिटणीस पदासाठी दिपेश सुराणा (सकाळ), लिना माने (पीसीबीटुडे), खजिनदार
संजय शिंदे (पुढारी) यांचा समावेश होता.
दोन्ही पवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हते. पण निवडणुकीच रिमोट
कंट्रोल मोठ्या पवारने आपल्या हातात ठेवल होत. त्यांनी या निवडणुकीला
जातीय रंग देण्याचा प्रयन्त ही केला. बोगस मतदार वाढवले याचा फटका मानेलाच
बसला.
संघाच्या इतिहासात प्रथमच मतदान प्रक्रिया होत होती.
यापूर्वीच्या सर्व निवडणुका सांमजस्याने बिनविरोध पार पडल्या होत्या.
एकमेकांत कितीही मतभेद असले तरी संघात कोणी राजकारण करत नव्हतं. नेमकी हीच
बाब मोठ्या पवारांना खटकत होती. कारण त्याला शहरातल्या पत्रकारांवर होल्ड
ठेवता येत नव्हता.
निवडणुकीच्या दिवशी मतदानाला जाताना आज तकच्या समिर शेख ने
गोविंद वाकडेला मतदान कसे करायच विचारल. त्यावेळी धाकला पवार तिथेच होता.
तसेच जेष्ठ पत्रकार छबु कांबळे हे देखिल तिथे होते. धाकल्या पवारच्या अंगात
अचानक 'भीम' संचारला आणि त्याने वाकडेला शिविगाळ करायला सुरवात केली.
यावेळी कांबळेनी धाकल्या पवाराला समजुतीच्या दोन गोष्टी सांगायचा प्रयन्त
केला. पण अंगात 'भीम' संचारलेल्या धाकल्या पवाराने त्यांच्याही वयाच्या,
अनुभवाचा मुलाहिजा न ठेवता त्यांनाही शिविगाळ केली. मोठा पवार हे सगळ
'विनोदाने' घेत होता.
दरम्यान, धाकला पवार थेट वाकडेला मारायला त्याच्या अंगावर
धाऊन गेला. मग सर्वांचा संयम सुटला आणि त्यांनी धाकल्याला मधे घेत धु धु
धुतल. त्यात मधस्थी करणाऱ्या मटाच्या रोहीत आठवलेच्या हाताला दुखापत झाली.
पुन्हा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बसली. त्यात देखील
प्रक्रियेत अडसर आणत रात्री काळा गॉगल घालून फिरणा-या मोराने वातावरण परत
पेटवले. त्यात आठवले ने गोंधळलात भर घालत बहिष्कार टाकत आपण प्राथमिक
सदस्त्वाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केल. (आठवले मागच्या कार्यकारणीत
सरचिटणीस होते) धाकल्याची अवस्था पाहुन 'विनोद' करणारा मोठा पवार मात्र
आपली पॉवर चालणार नाही हे लक्षात आल्याने तोंड घाली घालून बसला होता. धाकला
तर मार खाल्यानंतर पळून गेला होता. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की,
ती नियंत्राणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवाव लागल.
या नंतर मतदान थांबवा म्हणून काही लोकांनी स्टँड घेतला.
आरडा-ओरड सुरू होती. जुनी कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा
केविलपाणा प्रयत्न करत होत. या पॉवर गेम मध्ये आठवलेने शांततेने
घेण्यापेक्षा गोंधळ करण्याऐवजी पवार निती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणे
गरजेचे होते. गोंधळात काही लोकांनी मतदान सुरू ठेवण्याचा घाट घातल्याने
लांडगे गटाचे दोन लोक पडले.
या सर्व राड्यानंतर आता लांडगे काही करून दाखवतात की नुसत
मिरवतात हे येणा-या काळात स्पष्ट होईल. अनेक वर्षांपासून पडद्यामागून
घाणेरडी पॉवर निती करणा-यांचा बुरखा नव्या दमाच्या लोकांनी फाडल्याने
जेष्ठांसह नुकतेच या क्षेत्रात दाखल झालेले सुखावले आहेत.
तसेच या हाणामारीत ज्येष्ठ (वयाने) असलेले मंत्रालय प्रतिनिधी
विजय भोसले खाली पडले हे वेगळच. त्यांना इतरांनी हात दिला नाहीतर दवाखाना
लांब होता. 'विनोदाने' घेणारे भोसले मात्र या प्रकारने पुरते गोंधळले.
आता मोठा पवार माज सोडून देतो की धाकल्या पाठोपाठ मार खातो याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.