मुंबई - मराठी पत्रकार
परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली
असून परिषदेचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ आणि वयोवृध्द
पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर करण्यात आला आहे.11 हजार रूपये रोख
मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या 3 डिसेंबर
रोजी परिषदेच्या 77व्या वर्धापनदिनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या
पुरस्काराचे वितऱण करण्यात येणार आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याना
प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती मराठी पत्रकार
परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
परिषदेचा
प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार
चंद्रमोहन पुपाला यांना जाहीर करण्यात आला आहे तर प्र,के.अत्रे पुरस्कार
पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांना जाहीर झाला आहे.ग.त्र्यं.
माडखोलकर पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर बडगे यांना जाहीर
केला गेला आहे.अन्य परस्कार ज्यांना जाहीर झाले आहेत त्यांच्यात
पा.वा.गाडगीळ पुरस्कार कमलेश सुतार ( आज तक) सावित्रीबाई फुले पुरस्कार
प्रणाली कापसे (आयबीएन-लोकमत)भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार वसंतराव
कुलकर्णी ( मालेगाव जिल्हा वासिम)नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार
उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे ,दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार
नवी मुंबई येथील लोकसत्ताचे प्रतिनिधी विकास महाडिक यांना स्व.प्रमोद भागवत
शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे तुषार खरात यांना जाहीर कऱण्यात आला आहे.
रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार भंडारा जिल्हा मराठी
पत्रकार संघाला जाहीर कऱण्यात आला आहे.रोख रक्कम,स्मृतीचिन्ह मानपत्र असे
या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
मराठी
पत्रकार परिषदेच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा
करण्यात आली.यावेळी परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,किरण नाईक,
परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार माजी
सरचिटणीस संतोष पवार आदि उपस्थित होते.
यावेळी परिषदेचे नवे कोषाध्यक्ष म्हणून मिलिंद अष्टीवकर ( रोहा) यांची एकमताने निवड कऱण्यात आली .