नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीष महाजन यांना शेतकऱ्यांनी अडवले म्हणून चिडलेल्या पोलीस उपायुक्त अविनाश बारगळकडून "सकाळ'चे मुख्य बातमीदार महेंद्र महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे ,हे प्रचंड धक्कादायक व निषेधार्ह आहे.
महेंद्र महाजन यांना सुयश इस्पितळात भरती करण्यात आले आहे. हातापायाला व बरगड्याना मार लागला आहे.
या घटनेचं मूळ सिंहस्थादरम्यानच्या घडामोडींमध्ये दडलंय. त्यावेळी पोलिसांच्या अरेरावीवर सकाळनं खूप झोड उठवली होती. पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतही हा विषय सकाळनं लावून धरला होता. त्याचा राग काढण्याचं काम अनिल बारगळ या पोलिस अधिका-यानं केलं. आजच्या आंदोलनादरम्यान शेतक-यांनी पालकमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तिथं वार्तांकनासाठी आलेले पत्रकारही उपस्थित होते. त्यात शेतक-यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचवेळी महेंद्र महाजन यालाही बारगळनं जाणीवपूर्वक मारलं (तो वार्तांकनासाठी आलेला पत्रकार आहे, हे माहित असतानाही)... त्याच्या पायाला आणि बरगड्यांना मार लागला असून सध्या त्याला सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय....
11 महिन्यात 78 पत्रकारांवर हल्ले
11 महिन्यात 78 पत्रकारांवर हल्ले
एकीकडे महाराष्ट्रात पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा कऱण्यास दिरंगाई होत असतानाच दुसरीकडे पत्रकारांवर होणार्या हल्ल्यात कित्येक पटीनं वाढ झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.1 जानेवारी 2015 पासून आज 21 नोव्हेंबर 2015 या कालावधीत राज्यात 78 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.पुर्वी पाच-सहा दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत होता आता हे प्रमाण चार दिवसाला एका पत्रकारावर ह्ल्ला इथ पर्यत घसरले आहे.देशातील असहिष्णू वातावरणाचा हा परिपाक आहे काय ? हे आम्हाला माहिती नाही पण हल्ले वाढलेत हे वास्तव आहे.
या शिवाय धमक्या देणे,खोटे गुन्हे दाखल करणे,असे प्रकार राजरोस सुरू आहेत.खोटे गुन्हे दाखल करण्याचेही तीसच्या आसपास प्रकरणं समितीकडे आलेली आहेत.जीवे मारण्याच्या धमक्या तर दररोज दिल्या जातात आणि आता ते पत्रकारांच्याही अंगवळणी पडल्यासारखे झाले आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत अधिक आहेत हे आकडेवारीवरून दिसते.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे तारीखवार आणि नावासह तसेच हल्ल्याच्या कारणांसह ही आकडेवारी उपलव्ध असल्याने सरकारही त्याचा इन्कार करू शकत नाही.पत्रकार संरक्षण कायदा हाच यावरचा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे समितीचे म्हणणे असून त्यासाठी समिती गेली पाच वर्षे लढा देत आहे.परवा समितीने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची भेट घेतली तेव्हा मसुदा तयार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी त्याचे कायद्यात रूपांतर कधी होणार हे ठोसपणे कोणी सांगत नाही.
आज नाशिकमध्ये महेंद्र महाजन या पत्रकाराला पोलिसांनी बेदम मारहाण केली.त्याचा निषेध केला तर काही पत्रकारांनी निषेध किती दिवस करीत राहणार ? असा रास्त प्रश्न विचारला आहे.खरं तर जे पत्रकार असा प्रश्न विचारतात तेच पत्रकारांच्या लढ्यापासून स्वतःला दूर ठेवत असल्याने असे प्रश्न विचारण्याची वेळ त्यांच्यावर येते.आपला पांढरपेशी स्वभाव बाजूला ठेऊन सर्व पत्रकार एकत्र आले तर असा प्रश्न विचारण्याची वेळ कोणावरही येणार नाही हे तेवढंच खरं.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मात्र कायदा होईपर्यंत आपला लढा चालूच ठेवणार आहे
महेंद्र महाजन CCTV फूटेज;
मारहाण न केल्याचा पोलिसांचा दावा! म्हणे, सुरक्षित गर्दीतून बाहेर काढले!
आता पोलिसांवर महाजन यांनी हात उगारला,असे आरोप करण्यात पोलिस प्रमुख मागे पुढे नाही पाहणार कारण जेव्हा प्रकरण अंगलट येते तेव्हा पोलिस बचावासाठी असा पवित्रा घेतात।
महेंद्र महाजन CCTV फूटेज;
मारहाण न केल्याचा पोलिसांचा दावा! म्हणे, सुरक्षित गर्दीतून बाहेर काढले!
आता पोलिसांवर महाजन यांनी हात उगारला,असे आरोप करण्यात पोलिस प्रमुख मागे पुढे नाही पाहणार कारण जेव्हा प्रकरण अंगलट येते तेव्हा पोलिस बचावासाठी असा पवित्रा घेतात।