अभय निकाळजे पुढारीमध्ये

औरंगाबाद - दैनिक सकाळमध्ये अनेक वर्षे मुख्य वार्ताहर म्हणून काम केलेल्या अभय निकाळजे यांनी दैनिक सकाळचा स्वत:हून अखेर राजीनामा दिलेला आहे.त्यानंतर 1 डिसेंबर रोजी निकाळजे दैनिक पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीकरिता सिटी एडिटर म्हणून जॉईन होत आहेत.
दैनिक पुढारी अखेर 26 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती येत आहे.युनिट हेड म्हणून कल्याण पांडे हे अगोदरच जॉईन झाले असून,त्यांनी टीम जमा करण्यास सुरूवात केलेली आहे.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दोन बैठका झाल्या असून,सर्व्हेही करण्यात आल्याचे समजते.
कोल्हापुरात लोकमत विरूध्द पुढारी असा अनिर्णित सामना संपल्यानंतर पद्मश्रीने औरंगाबादेत पाऊल ठेवण्याचा निर्णय अखेर घेतला आहे.त्याची तयारीही सध्या सुरू आहे.यापुर्वी दोन वेळा प्रयोग फसल्यानंतर पद्मश्रीने आता मात्र औरंगाबादेतून पुढारी सुरू करण्याचा जणू चंगच बांधला आहे.