मुंबई -आमच्या
जग जिंकणा-या या वाहिनीत आधीच खंडीभर अँकर आहेत. त्यात पुन्हा जय महाराष्ट्र मधून सुवर्णा
जोशी, मनाली पवार आणि सामच्या सुप्रिया या दोघींची भर पडलीय. मात्र इतक्या अँकर्सचं करायचं काय, असा प्रश्न पडलाय. मात्र बुलेटिन काढण्यासाठी प्रोड्युसर नाहीत. त्यामुळे आहे
त्याच लोकांवर कामाचा ताण वाढला आहे. बरं या अँकर्सला बुलेटिन लावायला देऊन प्रोड्युसरलाचा
ताप होता. काही अँकर्सला तर साधी अँकर व्ह्युजअल बातमी टाईप करता येत नाही. पॅकेज तर
दूरच राहिलं. त्यात पुन्हा टीव्ही 9 मधून येणा-या श्वेता वडके आणि अजिंक्य भातंब्रेकर
यांची भर पडणार आहे. हे दोघेही इथल्या
अँकर्ससारखेच
अडाणी आहेत. त्यांनाही पॅकेज करता येत नाही, बुलेटिन लावता येत
नाही.
मात्र
मंदार फणसेंचं नेमकं काय धोरण आहे, हे सुद्धा कळायला
मार्ग नाही. त्यातच उपाध्याय सरांनी संपाद्कांचा सर्वांसमोर
पाणउतारा केला. त्यामुळे त्यांचे चेहरे पडलेले आहेत. आणि टीआरपी तर आधी पासूनच पडलेला
आहे.
साममधून
आलेल्या एका सुप्रिया अँकरनं तर कमालच केली . मंगळावर पाणी सापडल्याची बातमी देताना एका
गेस्टचा फोनो घेतला. त्या गेस्टला या सुप्रिया अँकरने विचारल, मंगळावर सापडलेल्या पाण्याचा मराठवाड्याला काय फायदा होईल ? या अचाट प्रश्नामुळे तिकडे गेस्ट आणि इकडे पीसीआर आणि न्यूजरूम चाट पडली होती.
आणि हे अँकर्स आता काय बुलेटिन लावतील ? याचा अंदाज तुम्हीच लावा.