संजीव शाळगावकर हे गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत असून,त्यापैकी १५ वर्षे पुढारीत काम केले आहे.पुढारीच्या तालमीत तयार झालेल्या शाळगावकरांवर पद्मश्रींनी पुन्हा विश्वास टाकून पुणे आवृत्तीची जबाबदारी सोपवली आहे.एकीकडे शाळगावकरांची नियुक्ती झालेली असताना,पुर्वीचे कार्यकारी संपादक गोपाळ जोशी यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.जोशी बुवांनी एक प्रकरण दाबले असून,त्याची थेट तक्रार पद्मश्रीकडे करण्यात आली होती,त्यामुळेच पद्मश्रींनी शाळगावकर यांची नियुक्ती केली असून,त्यामुळे जोशी बुवाची शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.संजय आवटे पुढारी सोडून सकाळमध्ये गेल्यानंतर पुणे आवृत्तीच्या प्रेस लाईनवर सुरेश पवार यांचेच नाव आहे.जोशी बुवाचे नाव प्रेस लाईनवर कधी आलेच नाही.प्रेस लाईनवर नाव येण्याअगोदरच त्यांची लाईन कट झाली आहे.
पुढारीचा पुणे शहर,पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये खप ढासळला असून,पद्मश्रींना चांगला कॅप्टन अजून तरी मिळालेला नाही.जुन्या खेळाडूवर पद्मश्री पुण्याचा खेळ खेळत असले तरी काही संस्थान पुढारीला मारक ठरत आहेत.पुणे उपनगरात एका बेगममुळे जुनी टीम डिस्टर्ब झाली असून,या बेगमने दोन प्लॅट आणि एक अलिशान गाड्या घेतल्या आहेत.पद्मश्री या बेगम साहेबांना कसा लगाम घालणार,याकडं लक्ष वेधलय.