पत्रकार संरक्षण कायदा करण्याच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल
पुढं टाकलं असून संभाव्य कायद्याचा मसुद सरकारनं तयार करून तो विरोधी
पक्षांना अवलोकनार्थ पाठविला आहे.जो मसुदा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये
पत्रकारांवरील हल्ला हा गुन्हा अजामिनपात्र आणि दखलपात्र ठरविला जावा ही
आपली मागणी मान्य केली गेली आहे असं समजतंय.शिवाय पत्रकाराची व्याख्या
करताना 1955 च्या श्रमिक पत्रकार कायद्याचा आधार प्रमाण मानल्यानं
पत्रकारितेतील बरेच घटक त्यात समाविष्ट झालेले आहेत.अगदी ऑनलाईनटन
पत्रकारिता कऱणार्यांनाही या कायद्याचं सरक्षण मिळणार आहे.
मसुद्यात पत्रकारांची व्याख्या काय केली आहे?,हल्लेखोऱांना
किती शिक्षा होऊ शकते?,दंडाचं काही प्रावधान कायद्यात आहे? एखाद्यानं
कायद्याचा गैरवापर केल्यास त्यावर काय करवाई होणार आहे?,केव्हा हल्ला झाला
तर पत्रकाराला कायद्याचं संरक्षण मिळणार आहे?,मालमत्तेच्या नुकसानीबाबत
काही तरतूद कायद्यात आहे? हा कायदा केव्हा अस्तित्वात येईल ? या सर्व
प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
सर्व पत्रकारांनी हा मजकूर बारकाईने वाचून त्यावरची आपली मतं
नोंदवावीत किंवा इमेलने मला कळवावीत.त्यानुसार दुरूस्तीसाठी आग्रह धरता
येईल.माझा मेल आयडी असा smdeshmukh13@gmail.com
- एस.एम.देशमुख