तब्बल वीस-पंचवीस दिवसांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पत्रकार
राम खटके यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून दोन लाख रूपये मिळाले आहेत.1
लाख 90 हजारांचा हा निधी आज खटके याच्यावर सोलापूरमधील ज्या रूग्णालायत
उपचार सुरू आहेत त्या रूग्णालयाच्या खात्यावर जमा झाला आहे.
उस्मानाबादला दिव्य मराठीसाठी काम करणार्या राम खटके एका अपघातात जखमी
झाला आणि कोमात गेला.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबं अडचणीत
सापडलं.हे वास्तव उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी
महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काही मदत मिळते
काय यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले.आम्ही आरोग्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश
शेटे याच्याशी संपर्क साधला.त्यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण
केली.त्यानंतर मंगेश चिवटे आणि विनोद जगदाळे थेट मुख्यमंत्र्यांकडे गेले
आणि त्यांनी त्यांची मंजुरी आणली.त्यानंतर प्रकरण अर्थ विभागाकडे
गेले.मात्र तेथे फाइल अडकून पडली.खटके कुटुंबिय पैश्याची प्रतिक्षा करीत
होते आणि इकडं फाईल पुढं सरकत नव्हती.आम्ही सारेच हताश झालो होतो.डोकं चालत
नव्हतं.टिपीकल नोकरशाहीच्या कारभाराचा अनुभव येत होता. अखेर काल आम्हीसात
-आठजण मोर्चा घेऊनच वैशाली पाटील यांना भेटलो आणि फाईल चालायला लागली.आज ही
रक्कम हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली.रामचा भाऊ सिध्देश्वर खटकेचा आज
फोन आला.उशिरा का होईना एक सत्कर्म आपल्या हातून घडल्याचा आनंद मिळाला.राम
खटकेला मदत मिळवून देण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत झाली अशा सर्वाचे आम्ही
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीन शतशः ऋुणी आहोत.
- एस.एम.देशमुख