नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले. मुंबई आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या सर्व पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था सुयोग या एेतिहासिक पत्रकार निवासस्थानात करण्यात आली होती. या शिबीराचे प्रमुख म्हणून पुढारीचे उदय तानपाठक यांची निवड करण्यात आली हाेती. मागिल वर्षीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी होणाऱ्या पार्ट्यांना दुष्काळाचे कारण देत चाप लावला होता. तसेच कोणत्याही मंत्र्यांनी पार्टी देउ नये, असे आदेश दिलेले आहेत. यामुळे नागपुरला मौजमजा करण्यासाठी आलेल्य अनेक पत्रकारांचा हिरमोड झाला. मात्र चांगली घसट असलेल्या विविध पत्रकारांच्या चार-पाच जणांच्या टिमने विविध अामदार, मंत्री यांच्याकडून दररोज वेगवेगळया ठिकाणी पार्टी घेतली. अधिवेशन संपण्यास एक दिवस बाकी असताना मंगळवारी ( दि. 22) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सुयोग निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिबीर प्रमुख आणि विधीमंडळ वार्ताहार संघाच्या अध्यक्षांना बडोले यांनी सांगितले की, सर्व पत्रकारांना नागपूरहून जातांना भेट म्हणून ४० किलो संत्रा मिठाई भेट पाठवून देत आहे. ती सर्वांमध्ये वाटून देण्यात यावी. त्यावर प्रमुखांनी यास होकार दिला. मात्र ती मिठाई ज्या गाडीतून पाठविण्यात आली. ती गाडीच सुयोगमध्ये येउन दिली नाही. सदरील ४० किलो ही शिबीर प्रमुख, विधिमंडळ वार्ताहार संघाच्या अध्यक्षांनी काही जवळच्या मित्रांना हाताशी धरत लंपास केली. विशेष म्हणजे अधिवेशन संपण्यास एक दिवस बाकी असतानाच या सर्वजणांनी सुयोग सोडून, एका कर्मचाऱ्याला जेवणाची व्यवस्था पाहण्यास सांगितले. यामुळे अधिवेशनस्थळी शेवटच्या दिवशी सर्वत्र लंपास झाालेल्या मिठाईचीच चर्चा करण्यात येत होती. अनेक पत्रकार खाजगीमध्ये नाराजी ही व्यक्त करत होते.