नवी दिल्ली - "आरएनआय'च्या ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक खप
असणाऱ्या "टॉप टेन' वृत्तपत्रांत "सकाळ'च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले
आहे. मराठी भाषिक वृत्तपत्रांमध्ये तर "सकाळ' पुणे अव्वल स्थानीच आहेच, तर
देशातल्या प्रांतीय भाषिक वृत्तपत्रांत "सकाळ' तिसऱ्या स्थानावर आहे.
देशात वृत्तपत्रांची वाढ सुमारे 5.8 टक्के या वेगाने होत असल्याचेही या
अहवालामध्ये म्हटले आहे.
देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीची सर्वोच्च संस्था असलेल्या "आरएनआय' म्हणजेच "रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया'च्या "प्रेस इन इंडिया' या ताज्या अहवालानुसार, एका आवृत्तीच्या सर्वाधिक खपाच्या भाषिक वृत्तपत्रांच्या (हिंदी, इंग्रजी वगळून उर्वरित) भारतातील "टॉप टेन'च्या यादीत स्थान पटकावण्याचा मान मराठी वृत्तपत्रांमध्ये केवळ "सकाळ'च्या पुणे आवृत्तीला मिळाला आहे. या श्रेणीत प. बंगालमधील "आनंदबझार पत्रिका' आणि "बर्तमान' या दैनिकांबरोबरच तीन हिंदी आणि चार इंग्रजी भाषिक दैनिकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात मराठी व अन्य भाषांत मिळून 904 नियतकालिकांच्या एकूण 2.29 कोटी प्रती प्रसिद्ध होतात. त्यापैकी पहिल्या 50 नियतकालिकांमध्ये "सकाळ'च्या पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिक या "लखपती' आवृत्त्यांचा समावेश आहे
देशातील एकूण दैनिकांपैकी हिंदी वृत्तपत्रांचे दैनिक वितरण 47.71 टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप 11.40 टक्के आहे. मराठी दैनिके उर्दू व तेलुगू भाषांनंतर पाचव्या स्थानी आहेत, असे अहवालातील आकडेवारी सांगते.