मराठवाडयातील ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांना संपत डोके नामक राष्ट्रवादीच्या नगरसेवकानं केलेली अर्वाच्च शिविगाळ आणि डोके शिव्या घालत असताना सुनील ढेपे यांनी दाखविलेला संयम याची क्लिप काल उभ्या महाराष्ट्रानं ऐकली.ही शिविगाळ झाल्यानंतर सुनील ढेपे यांनी संपत डोकेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.तो जामिनपात्र असला तरी डोके सारख्या शहर दादांच्या विरोधात कुणीतर तक्रार दाखल कऱण्याची हिंमत दाखवितो हा मेसेज महाराष्ट्रभर गेला आहे.तुम्ही आमच्यावर हल्ले करा,शिविगाळ करा आम्ही कायदा हातात न घेता तुमचं करिअर बरबाद करू शकतो हा बोध हल्लेखोरांपर्यत पोहोचला आहे.सुनील ढेपेंच्या मागे काल उभा महाराष्ट्र असल्याचे आशादायक चित्र दिसलं.
अनेकजण मला विचारतात,तुम्ही दहा वर्षे लढताहात तुमच्या पदरात काय पडलं माझं उत्तर एकच आहे,आम्ही एक झालो ही मोठी उपलब्धी आहे.सुनील ढेपेच्या निमित्तानं ती जगाला दिसली.आम्ही तर सुनील ढेपे बरोबर खंबीरपणे उभे आहोतच पण महाराष्ट्रातील पत्रकारांचेही आम्ही आभारी आहोत की,त्यांनी खंबीरपणे ढेपेंना साथ दिली,त्याचं मनोबल वाढविली.नुसता निषेध करून काय होणार म्हणणार्यांनी हे लक्षात ठेवावं की,निषेधाचाही एवढा पाऊस पाडा की,हल्लेखोराना गावात तोंड दाखवायलाही जागा उरली नाही पाहिजे.संपत डोकेची काल अवस्था अशीच झाली आहे.हा सारा प्रकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याही कानावर घातला गेला आहे.तिकडूनही डोकेचे कान उपटले गेले आहेत.आपण सार्यांनी चोहोबाजुनी प्रयत्न केल्याने सुनील ढेपे याना हत्तीचं बळ मिळालं.प्रत्येक पत्रकाराच्या बाबतीत आपली हीच भूमिका राहिली तर हल्लेखोरांना दहादा विचार करावा लागेल हे नक्की..
- एस.एम.देशमुख
निमंत्रक
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती
.........
पत्रकारांच्या एकजुटीचा प्रत्यय

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक,गटनेते आणि नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या संपत डोके यांची मंगळवारी जीभ घसरली.एखादा अशिक्षित माणूस सुध्दा देणार नाही,इतक्या घाण शिव्या त्यांनी आम्हाला मंगळवारी सकाळी सकाळी दिल्या आणि आमच्या आई - बहीणीचा उध्दार केला.पत्रकार हा समाजाचा आरसा असतो,त्यांनाच इतक्या घाण शिव्या देणार असाल तर सामान्य माणसाबरोबर आपले काय व्यवहार असतील,याची कल्पनाच न केलेली बरी.अश्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला राष्ट्रवादी नगराध्यक्ष करणार आहे का,हा आमचा खरा सवाल आहे.
गोष्ट तशी साधी आहे.उस्मानाबाद लाइव्हवर आमचे गोफणगुंडा नावाचे सदर आहे.या सदराच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांची फिरकी आम्ही घेत असतो.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे सदर अत्यंत लोकप्रिय झाले होते.विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांची चांगलीच फिरकी घेतली होती.पण त्यांची कधीच जीभ घसरली नाही.त्यांनी कधी मला शिवी दिली नाही की कसली धमकी दिली नाही.राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरही अनेकवेळा प्रखर टीका केलेली आहे,पण त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडलेला नाही.परंतु त्यांच्याच पक्षात असलेल्या संपत डोके यांनी जो असंस्कृतपणा दाखवला आहे,तो कोणालाही पचणारा नाही.त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचा निषेध आणि धिक्कार होत आहे.
वास्तविक गोफणगुंडामध्ये त्यांचे नाव घेतलेले नव्हते किंवा तसे वेडेवाकडेही लिहिलेले नव्हते.परंतु केवळ हातात आलेले नगराध्यक्षपद गेले म्हणून मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांनी आपली मळमळ बाहेर काढली.त्यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतील,अशी अपेक्षा आहे.
यानिमित्त महाराष्ट्रातील पत्रकारांच्या शक्तीचा प्रत्यय आला.पत्रकार हल्ला कृती समितीचे निमंत्रक आणि आमचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख यांनी अत्यंत तातडीने मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून डोकेंवर कारवाई करण्याबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली.त्यांची मागणी किती रास्त आहे,यानिमित्त दिसून येत आहे.मुंबईतील अनेक पत्रकारांनी आपापल्या परिने वरिष्ठांशी संपर्क साधून डोकेवर काय कारवाई करता येते,याची चाचपणी केली.
महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे व्हॉटस् एॅप ग्रुप मंगळवारी निषेधांनी भरले होते.उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक व्हॉटस् एॅप ग्रुपवर हीच चर्चा होती.व्हॉटस् एॅपबरोबर फेसबुकही निषेध करण्यात येत होता.सोशल मीडियाची पॉवर काय असते,हे यानिमित्त दिसले.
जे राजकारणात मोठे होतात,त्यांची डोकेसारखी जीभ कधीच घसरत नाही.डोके नसलेले लोकच असे वागतात.त्यांनी शिविगाळ करून आणि धमक्या दाखवून आमच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाही.उलट उस्मानाबादसह महाराष्ट्रतील पत्रकार आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने दाखवलेला पाठींबा पाहून आमच्या लेखणीला अधिक बळ मिळालेले आहे.
पत्रकारितेच्या २५ वर्षाच्या काळात अश्या अनेक धमक्या आणि मारहाणीचे प्रकार आमच्या जीवनात घडलेले आहेत.डोके आमच्यासाठी नवे नाहीत.परंतु यानिमित्त आमच्यामागे कोण कोण उभे राहतात,याचा प्रत्यय दिसून आला.या सर्वांचे आभार...