बदलता सकाळ आणि दर्डाशेठच्या हालचाली

औरंगाबाद - प्रिंट मीडियात एकीकडे मंदीची लाट आली असताना,सकाळ वृत्तपत्र समुहाने आपला विस्तार सुरू केला आहे.औरंगाबादचे प्रिंटीग युनिट नांदेडला हलवण्यात आले असून,औरंगाबादला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रिंटीग युनिट बसवण्यात आले आहे.एकाच वेळी २० पाने सप्तरंगात छपाई करणारे हे युनिट आहे.अशी युनिट मराठवाड्यात फक्त सकाळकडे आहे.त्यामुळे औरंगाबाद शहर,औरंगाबाद ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात क्रमांक तीनवर असलेला सकाळ आता पुन्हा क्रमांक एकसाठी स्पर्धा करत आहे.
सकाळच्या नव्या प्रिंटीग युनिटचे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला उद्घाटन झाले.यानिमित्त सकाळने दोन दिवसात नविन कंटेंट घेवून अंक काढला.पहिल्या दिवशी ब्लॅक व्हॉईट आणि दुस-या दिवशी सप्तरंगात अंक काढला.त्या अंकाची जोरदार चर्चा सुरू आहे.औरंगाबादेत पाच वर्षानपुर्वी जेव्हा दिव्य सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत ७५ टक्के कर्मचारी सकाळ सोडून दिव्य आणि लोकमतला गेले आहेत.मात्र कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी नविन टीम तयार करून मुकाबला सुरू केला आहे.
सकाळच्या दोन दिवसाचे अवलोकन केले असता,कंटेंट उत्तम,फोटोग्राफी लाजबाब,प्रिटींग नंबर १ असे स्टार द्यावे लागतील.सकाळने औरंगाबादला करोडो रूपयाचे नवे प्रिंटींग युनिट बसवून मोठे धाडस केले आहे.त्यामुळे वरकड यांची कसोटी लागलेली आहे.
सकाळची नांदेड आवृत्ती मार्चअखेर सुरू होणार आहे.त्याचबरोबर अकोला आवृत्तीही याच दरम्यान सुरू होईल.या नव्या आवृत्तीमुळे अनेकांना संधी मिळेल.
सकाळने केलेले बदल आणि येवू घातलेला पुढारी यामुळे लोकमतचे दर्डा शेठ हादरले आहेत.रोज मिटींगवर मीटींग सुरू आहेत.विजय दर्डा काही दिवसापुर्वी औरंगाबादला येवून गेले.मंत्रीपद आणि आमदारकी गेल्यामुळे राजेंद्र दर्डा लोकमतमध्येच गुंतून पडले आहेत.स्वत: रोज मीटींगवर मीटींग घेत आहे.सोबत करण आणि ऋषी दर्डा त्यांना साथ देत आहेत.सकाळवर घाव घालण्यासाठी दर्डाशेठच्या हालचाली सुरू आहेत.कोणते सावज हाती लागते का,याबाबत चाचपणी सुरू आहे.मात्र कोणीच हाती लागत नाही.
पुढारीने औरंगाबादला पाय ठेवण्यास खूप उशिर केलेला आहे.दिव्य येण्यापुर्वी त्यांनी सुरूवात केली असती तर पुढारी किमान ३ वर राहिला असता.नवे युनिट मँनेजर कल्याण पांडे आणि सिटी एडिटर अभय निकाळजे यांनी नविन टीम उभा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.मात्र त्यांना हवी ती माणसे मिळत नाहीत.लोकमतमध्ये जे ट्रेनी आहेत,तेच त्यांच्या संपर्कात आहेत.त्यामुळे दर्डा शेठनी ट्रेनी लोकांना पगार वाढवण्याचा फॉम्र्युला सुरू केला आहे.
काहीका असेना,सकाळ बदलला,पुढारी येवू पहात आहे,यामुळे मराठवाड्यातील पत्रकारांना पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत....