प्रवीण बर्दापूरकर यांचे बेरक्यास पत्र


   स.न. 
  'लोकसत्ता'चे आणि आमचे माजी संपादक डॉ . अरुण टिकेकर यांच्या निधनानंतर लिहिलेल्या धनंजय कर्णिक आणि माझ्या पोस्ट बेरक्याने आम्हाला कल्पना न देता पुनर्मुद्रित केल्या आहेत . आज म्हणजे मंगळवार , २६ जानेवारीला त्या वाचण्यात आल्या . त्यात शेवटी "एकीकडे संबंध महाराष्ट्रातील पंत्रकार टिकेकर यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत असताना,लोकसत्तात काम केलेले धनंजय कर्निक आणि प्रविण बर्दापूरकर यांनी टिकेकर यांच्याबद्दल जे लिहिले आहे,ते योग्य आहे का ?" अशी विचारणा केलेली आहे .
एक मुद्दा- 'लोकसत्ता'चा राजीनामा दिल्यावर मी ; माधव गडकरी , सुरेश द्वादशीवार , अरुण टिकेकर आणि कुमार केतकर या चार संपादकांची 'वर्किंग प्रोफाईल' रेखाटली . त्यात माझे टिकेकर यांच्याविषयीचे मतप्रदर्शन विस्ताराने आहे आणि टिकेकर हयात असतानाच 'दिवेस असे की ...' या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाविष्ट झाले ; पुस्तक आजही उपलब्ध आहे . 
शिवाय या टिकेकर यांच्यासह अन्य तिघांसंबंधी असलेला हा विस्तृत मजकूर 'युगांतर'च्या दिवाळी अंकात (२०११) अंकातही प्रकाशित झालेला आहे . 'युगांतर' मधील मजकूर वाचल्यावर अरुण टिकेकर आणि माझ्यात बरीच 'एसएस बाजी' झाली होती पण , ते संदेश पुढे डिलीट झाले . मात्र त्यानंतर आम्हा दोघात संवाद मात्र राहिला नाही ; किंबहुना - 'मी तुमचा नंबर डिलीट करतोय , माझाशी संपर्क साधू नये, असे टिकेकर यांनी मला कळवले होते हे खरे ! त्यामुळे नंतर दोन-तीन वेळा समोरासमोर भेट झाल्यावर शिष्टाचाराचा भाग म्हणून असणाऱ्या अभिवादना व्यतिरीक्त संवाद घडला नाही ; घडणे शक्यही नव्हते . 'युगांतर' दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर सुमारे दोन-अडीच महिन्यांनी या पुस्तकाचे नागपूर आणि मुंबईत रीतसर प्रकाशन झाले .
त्यामुळे किमान मी तरी टिकेकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्यासंबधी प्रतिकूल लिहिले या म्हणण्यात मुळीच तथ्य नाही .  
     राहता राहिला प्रश्न दिनकर रायकर यांच्या संबंधीचा पण ,तो  नंतर कधीतरी म्हणजे योग्य वेळ आल्यावर !
कळावे ,

-प्रब  
9822055799 / 9011557099
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- www.praveenbardapurkar.com/newblog