वयोवृध्द
आणि ऋषीतुल्य पत्रकार दिनू रणदिवे यांच्या जीवनगौरव सन्मान सोहळ्यास
शिवसेना पत्रप्रमुख उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांनी
उपस्थित राहू नये असा अटोकाट प्रयत्न केल्यानंतरही हे दोघेही मराठी पत्रकार
परिषदेच्यावतीने आयोजित या सोहळ्यास उपस्थित राहिल्याने रिकाम टेकडे कुमार
कदम आणि देवीदास मटाले तोडांवर आपटले.मराठी पत्रकार परिषद आणि
एस.एम.देशमुख या ’सुमार’ लोकांना पुरून उरल्याचे चित्र काल ठाण्यात बघायला
मिळाले.
मराठी
पत्रकार परिषद या 77 वर्षाची परंपरा असलेल्या ,आणि मराठी पत्रकारांची
मातृसंस्था असलेल्या संस्थेवर प्रशासक असल्याची अफवा गेली पंधरा दिवस कुमार
कदम पसरवित फिरत आहेत.कुमार कदम यांनी अगोदर अरूण टिकेकर यांना फोन करून
मराठी पत्रकार परिषदेवर प्रशासक असल्याची थाप मारली.त्यासाठी खालच्या
कोर्टाच्या निकालाची काही कागदपत्रेही त्यांना पाठविली.त्यामुळे
स्वाभाविकपणे टिकेकर यांनी ’मी कोणत्याही वादात पडू इच्छिच नसल्याचे सांगत
आयोजकांना मी येणार नसल्याचा मेल पाठविला.त्यानंतर एस.एम.देशमुख यांनी
टिकेकरांना फोन करून सारी वस्तुस्थितीं विषद केली.त्यानं टिकेकर यांचे
समाधान झाले आणि त्यांनी कार्यक्रमास येण्याचे मान्य केले. ते कार्यक्रमास
उपस्थितही राहिले.
2
तारखेच्या सामनात मराठी पत्रकार परिषदेच्या ठाण्यात होत असलेल्या
राज्यस्तरीय पत्रकार सोहळ्यास आणि दिनू रणदिवे यांच्यासह अकरा ज्येष्ट
पत्रकारांच्या सत्कारास उध्दव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची बातमी
प्रसिध्द झाल्यानंतर या सोहळ्यास उध्दव ठाकरे यांनी जाऊ नये यासाठी
फिल्डिंग लावणे सुरू झाले.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास
मटालेे यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र मातोश्रीकडे रवाना करण्यात आले.( हे
पत्र बेरक्याच्या हाती लागले आहे.) या पत्रात "मराठी पत्रकार परिषदेवर 2006
पासून प्रशासक असून एसेम देशमुख आणि त्यांचे सहकारी सरकारची दिशाभूल करून
विविध उपक्रम राबवित आहेत.त्यामुळे आपण अशा कार्यक्रमास जाऊ नये" अशी गळ
उध्दव ठाकरेंना घातली गेली. परिषदेपासून सारे लाभ मिळवून मातृसंस्थेच्या
विरोधात गद्दारी करणारे हे टोळके एवढ्यावरच थांबले नाही तर मंगळवारी रात्री
आठच्या सुमारास मातोश्रीवरही धडकले.मात्र तेथे गेलेल्या सुमार मंडळीची
लायकी उध्दव ठाकरेंना माहिती असल्यानं त्यांनी सुमारांना साधी भेटही दिली
नाही.त्यामुळे हे सुमार हात हलवत परत आले.त्यानंतर शिवसेनेच्या काहींना
मध्यस्थी घालून उध्दवजींना ‘अडविता येते का‘ ते पाहण्याचाही प्रयत्न
झाला.मात्र एसेम देशमुख यांनी ‘संघर्षाची पंच्याहत्तरी’ हे पुस्तक
मातोश्रीवर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविलेले असल्यानं आणि त्या
पुस्तकात सारी वस्तुस्थिती मांडलेली असल्याचे पाहून उध्दव ठाकरे यांनी
कार्यक्रमास येण्याचे ठरविले आणि ते कार्यक्रमासही आले.कदम,मटालेंच्या
नाकावर टिच्चून मराठी पत्रकार परिषदेचा हा सोहळा दृष्ट लागावा असा
झाला.उध्दव ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी नेहमीच्या ठाकरी भाषेत
कदम,मटालेंना टोला लगावलाच.’देशमुख यांच्यावर टिका आणि आरोप करणार्यांना
माझा एक प्रश्न आहे,दिनू रणदिवेंचा सत्कार करावा ही कल्पना त्यांना का
सूचली नाही.कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते करू द्या,आडवे येऊ नका’
अशा शब्दात त्यांनी कुमार कदम,मटाले यांचे नाव न घेता त्यांचे कान उपटले.
खरं तर उध्दव ठाकरेंच्या या सल्ल्याकडं सुमारराव आणि मठ्ठाले यांनी
दुर्लक्ष न कऱणे त्यांच्या हिताचे आहे.
हे
दोन्ही टोणगे मराठी पत्रकार परिषदेच्या विरोधात का आहेत.दोन कारणं आहेत
असं आम्हाला कळलं आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पत्रकार प्रबोधिनीची जवळपास
वीस कोटीची प्रॉपर्टी सुमाररावांनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता.त्याला
एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेने विरोध करीत हे प्रकरण नाशिकच्या
चॅरिटी कमिशनरकडे नेले.त्याची केस सध्या नाशिकमध्ये सुरू आहे.या खटल्याचा
निकाल जर परिषदेच्या बाजुने लागला तर सुमाररावांना पळथाभुई थोडी होईल अशी
माहिती बेरक्याला मिळाली आहे आहे. या संस्थेत जवळपास चाळीस लाख रूपयांचा
घोटाळा झालेला आहे.हे प्रकऱण बाहेर येऊ नये म्हणून सुमाररावांच्या नतद्रष्ट
कारवाया सुरू आहेत.( देशमुख यांच्यावर चिखलफेक कऱण्यापुर्वा नाशिकच्या
पत्रप्रबोधिनीची भानगड काय आहे आणि रंगाण्णा वैद्य यांचं जर्नालिझम
युनिर्व्हसिटीचं स्वप्नं कुणामुळं पूर्ण झालं नाही याचा खुलासा कुमार कदम
यांनी केला पाहिजे.)
दुसरं
कारण आहे मुंबई मराठी पत्रकार संघानं ढापलेले मराठी पत्रकार परिषदेच्या
जागेचे.मुंबई मराठी पत्रकार परिषदेची वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा
मराठी पत्रकार परिषदेची आहे.1991 मध्ये सरकार,मुंबई मराठी पत्रकार संघ आणि
मराठी पत्रकार परिषद यांच्यात झालेल्या एका करारानुसार ही जागा परिषदेने
मुंबई संघाला द्यावी,तेथे पत्रकार भवन बाधून झाल्यावर त्यातील काही हिस्सा
परिषदेला द्यावा असे ठरले होते.त्याचा जीआरही निघाला होता. बेरक्याला जी
माहिती मिळाली आहे त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेने इमारतीच्या
बांधकामासाठी 1991ला 70 हजा रूपये दिलेले आहेत.मात्र इमारत बांधून
झाल्यानंतर परिषदेला जागा देण्यास मुंबई संघानं टाळाटाळ केली.त्यानंतर हे
प्रकऱण परिषदेने सरकार दरबारी उपस्थित केले.त्याची सुनावणी तत्कालिन सचिव
सुधीर ठाकरे यांनी घेऊन परिषदेला जागा मिळाली पाहिजे असा निकाल त्यांनी
दिला.मग जिल्हाधिकर्यांनी एक आदेश काढून परिषदेने पत्रकार भवनातील जागेचा
ताबा घ्यावा असा आदेश काढला.मात्र दोन संस्थात वाद नको या भूमिकेतून ,
सामजस्यातून हा प्रश्न सुटावा असा प्रयत्न परिषदेने केला.परंतू या
आदेशालाही आता 6 वर्षे होऊन गेलीत तरी मुंबई संघ आपली जागा देत नाही
म्हटल्यावर परिषद कोर्टात जाण्याची तयारी करीत असल्याची कुणकुण लागल्याने
परिषदेला आणि एस.एम.देशमुख यांना अपशकून कऱण्याचा प्रयत्न होत
आहे.एस.एम.यांना बदनाम केले तर परिषदेची चळवळ मोडून पडते आणि जागेचा आणि
नाशिकच्या पत्रप्रबोधिनीचा विषयही मागेे पडतो. या विचाराने एसेम विरोधात ही
मोहिम सुरू आहे, ( संघर्षाची पंच्याहत्तरी हे एसेम यांचे पुस्तक उद्याचा
बातमीदार या या वेबसाईटवर उपलब्ध आहे ज्यांना हा विषय विस्ताराने समजुन
घ्यायचाय त्यांनी http://www.batmidar.in/
या लिंकवर क्लीक करावी ) शिवाय एसेम सकारात्मक भूमिकेतून काम
कऱणारे पत्रकार आहेत.पत्रकारांच्या आरोग्यासाठी पत्रकार आरोग्य सेवा कक्ष
त्यानी स्थापन करून ग्रामीण पत्रकारांना मदत कऱण्याचा निर्णय घेतला
आहे.गेल्या दोन महिन्यात सहा-सात पत्रकारांना त्यानी आर्थिक मदत मिळवून
दिली आहे.कायदा आणि पेन्शन हे दोन्ही एसेम यांच्या जिव्हाळ्याचे विषय
मार्गी लागत आहेत ,त्याचे श्रेयही देशमुखांनाच मिळणार आहे.हे होण्यापुर्वी
देशमुख आणि देशमुख यांची संघटनेला बदनाम करावे या भूमिकेतून हे विदूषकी
चाळे चालू असून हे केवळ एका संस्थलाच नाही तर एसेम यानी मोठ्या
कष्टानं,त्याग करून उभारलेल्या पत्रकारांच्या चळवळीला हानीकाऱक असल्याने
अशा कोणत्याही अफवांवर राज्यातील पत्रकारांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन
बेरक्या करीत आहे.हे आवाहन करीत असताना आम्ही स्पष्ट करू इच्छितो की,
बेरक्यानं एसेम यांचं वकिलपत्र घेतलेलं नाही मात्र बेरक्यानंही
पत्रकारांच्या हक्काचा लढा गेली तीन चार वर्षे चालू ठेवलेला आहे.आमची आणि
एसेम यांची पत्रकारांच्या प्रश्नी असलेल्या बांधिलकीतूनच आम्ही सातत्यानं
एसेम यांच्या आंदोलनास मदत केलेली आहे.आजही केवळ एसेम यांना संपविण्यासाठीच
मुंबईतील काही रिकामटेकडे,बदनाम फरिस्ते प्रयत्न करीत असल्यानं आम्ही सारं
सविस्तर मांडलेलं आहे.एसेम जेव्हा पत्रकारांच्या विरोधातली भूमिका घेतील
तेव्हा बेरक्या त्यांनाही माफ करणार नाही हे नक्की.