वसतिगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणात जेलची हवा खावून आलेला आरोपी झाला पत्रकार ..!!


थेट मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलीस अधीक्षकाची पास छातीला लावून बसला पत्रकारांच्या पहिल्याच रांगेत!!

जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील मुलीच्या लैंगिक शोषनाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी  संपूर्ण मराठवाडयात चांगलेच गाजले होते. वसतिगृहाच्या अधीक्षकेसोबत असलेल्या मैत्रीचा गैरफायदा उठ्वुन संभाजी ब्रिगेडचा तथाकथित स्वयंघोषित कार्यकर्ता भरत मानकर याने आँक्टोबर २०१५ मध्ये मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यामध्ये भरत मानकर व त्याची मैत्रीण अधीक्षका या दोघांना पोलीस कोठडीची आणि जेलची हवा मिळाली होती. मानकर हा जेलची हवा खावून आल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या स्थानिक  अध्यक्षाच्या क्रुपेने औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक जनपत्रचा जालना येथील प्रतिनिधी झाला. भरत मानकर याच्याविरुद्ध ज्या पत्रकारांनी रकानेच्या रकाने भरून मोठया - मोठया बातम्या छापल्या होत्या, त्याच पत्रकारांच्या पहिल्या रांगेत दि. ११ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत मानकर हा ताठ मानेने बसला होता. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा पास त्याने स्वतःच्या छातीवर लावला होता. त्यामुळे पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला तर पोलीस यंत्रणाही गोंधळून गेली.

पोलीस प्रशासन आणि माहिती कार्यालयाची गंभीर चूक!

मुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या सभाचे पास देतांना पोलिसांकडून अनेकदा पत्रकारांची हिस्टरी तपासल्या जाते. एखादा गुन्हा असेल तर त्याची पास नाकारण्यात येते. मात्र, मानकरला पास देतांना जालना पोलिसांनी असे कोणतेही रेकॉर्ड तपासले नाही, ही गंभीर चूक आहे.
याप्रकरणात पोलीसांबरोबरच  जालनाच्य जिल्हा माहिती अधिकार्यांची बेपर्वाईही तेवढीच कारणीभूत आहे. वसतिगृह मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वर्तमानपत्रानी मोठी प्रसिद्धी दिलेली माहिती असताना त्यातील आरोपीला पास देण्यासाठी पोलिसांकडे शिफारस करण्याचा जिल्हा माहिती अधिकार्यांचा हेतु काय ? असा सवाल निर्माण होत आहे.