बेरक्याचे भाकीत खरे ठरले ...मी मराठीचा बाजार अखेर उठणार...

मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.मी मराठीचा बाजार आता काही दिवसांत उठणार आहे.तसे मुख्य संपादक रवी आंबेकर यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकले आहे.
मी मराठी कर्मचाऱ्यांची काल शुक्रवारी मुख्य संपादक रवी आंबेकर यांनी मीटिंग घेवून सांगितले की, पेमेंट आता वेळेवर होणार नाही, जानेवारी महिन्याच्या पेमेंटला दोन ते तीन महीने उशिर होवू शकतो,
याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोतेवार गजाआड झाल्यामुळे मी मराठी आता जास्त दिवस चालणार नाही, कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधावा ...यामुळे मी मराठीच्या 100 हून अधिक कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय ...
मी मराठीचा मालक आणि समृध्दजीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवार गजाआड झाल्यामुळे आणि या कंपनीची सर्व बँक खाते गोठवण्यात आल्यामुळे मी मराठी चॅनलच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी होण्याची शक्यता कमी आहे.सर्व महत्वाचे कर्मचारी/ अँकर अगोदरच सोडून गेले आहेत.आता उरले सुरले हळू हळू निघून जातील.