'महाराष्ट्र टाइम्स'ची उचलेगिरी !

नाशिक - अन्य दैनिकात आलेल्या बातम्या जश्याच्या तश्या उचलणे,ही बाब वृत्तपत्रासाठी नवी नाही,परंतु अन्य वृत्तपत्रात बायलाईन प्रसिध्द झालेली बातमी आपल्या वृत्तपत्रात स्वत:च्या बायलाईनसह देणे,अत्यंत शरमेची बाब आहे,तेही महाराष्ट्र टाइम्ससारख्या वृत्तपत्राने करावे,हे आणखी एक दुर्देव...

सकाळ वृत्तपत्र समुहाचे कृषी दैनिक अग्रोवनमध्ये ९ फेब्रुवारी रोजी भारतीय द्राक्षांना विदेशात मागणी वाढली ही बातमी ज्ञानेश उगले यांच्या नावासह प्रसिध्द झाली आहे.ही बातमी महाराष्ट्र टाइम्सचा निफाड वार्ताहर सुनील कुमावत यांनी जशीच्या तशी उचलून आपल्या नावासह आज सोमवार दि.१५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केली आहे.

निफाडच्या कुमावतने उचलेगिरी करताना अग्रोवनचे बातमीतील बाईट,टेबल जशीच्या तशी उचलली आहे.नाशिकचा म.टा.डेक्सही झोपेत होता का,यावर प्रश्नचिन्ह आहेत.म.टा.च्या उचलेगिरीची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.