- पुण्याचे ले-आऊट रद्दड
- नगर, पुणेच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना
पुणे : पुण्यात महाराष्ट्र टाईम्सने मारलेली मुसंडी, दुसर्या क्रमांकावर आलेले लोकमत आणि पुण्यनगरीने ग्रामीण भागात सुरु केलेली घोडदौड पाहाता, पद्मश्रींनी तातडीची बैठक घेऊन संपादकीय धुरिणांना सर्वांसमोर झापझाप झापले. पुण्याचे ले-आऊट रद्दड आहे. पुढारी अवघा 77 हजारांवर आला. परफॉर्मन्स चांगला असेल तरच पगारवाढ मिळेल, असे खडेबोल पद्मश्रींनी सुनावले. नगर आवृत्तीला आलेली मरगळ पाहाता, तेथेही लवकरच बदल करण्याचे संकेत पद्मश्रींनी दिले आहेत.
मंगळवारी पद्मश्रींनी एका खासगी हॉटेलात तातडीची बैठक घेतली. सर्व संपादकीय कर्मचारी, उपनगरांचे वार्ताहर व संपादकीय प्रमुखांना या बैठकीला बोलाविण्यात आले होते. वरिष्ठ कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी पुणे आवृत्तीत मोठ्या प्रमाणात बातम्या सुटत असल्याची बाब चव्हाट्यावर आणली. 54 महत्वाच्या बातम्या महिनाभरात सुटल्याचे पवार यांनी सांगितले. पद्मश्रींनी तर 2007 नंतर पहिल्यांदाच अंकाची एवढी मोठी घसरण झाली असल्याचे सांगून, काय पाहिजे ते मागा परंतु, अंक सावरा अशी सूचना केली. चांगली पगारवाढ दिली जाईल. परंतु, परफॉर्मन्स चांगला पाहिजे, असा दट्टाही त्यांनी लावला. एक लाख 30 हजार असलेला अंक एवघा 77 हजारांवर आला. सकाळ, लोकमत आणि महाराष्ट्र टाईम्सनंतर पुढारीचा क्रमांक लागतो, असे वास्तवही त्यांनी मांडले. नगर आवृत्तीला प्रचंड मरगळ आलेली आहे. तेथे बदल करण्याचे संकेतही पद्मश्रींनी दिले. लवकरच तेथे एक ज्येष्ठ संपादक नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
जोशीबुवा गैरहजर!
दरम्यान, या महत्वपूर्ण बैठकीला निवासी संपादक असलेले गोपाळ जोशी हे आईच्या आजारपणाचे कारण सांगून गैरहजर होते. परंतु, अपयशाचे खापर आपल्या डोक्यावर फुटणार असल्याचे कळल्यानेच त्यांनी बैठकीला येणे टाळले, अशी चर्चा होती. जोशीबुवांचा राजीनामाही पद्मश्रींना मिळाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.