'सकाळ"चे अभिनंदन, "लोकमत"ची आक्षेर्पाह पत्रकारिता

जळगाव - आज खूप दिवसानंतर "सकाळ'ने खुश केले, समाधान दिले. JNU निषेध कार्यक्रमाची एक बातमी आज स्थानिक दैनिकांनी प्रसिद्ध केलीय. "लोकमत"ने अवास्तव सहा कॉलम, फारच अवाजवी प्रसिद्ध केलीय. एरव्ही या दैनिकात लोकोपयोगी बातम्या छापायलाही जागा नसते म्हणतात. "दिव्य मराठी"ने नेटके आणि नेमकेच स्थान दिलेय. दीपक पटवे जावून आमचे मित्र त्र्यंबक कापडे निवासी संपादक व मकरंदराव वृत्तसंपादक असल्यापासून ते बहुतांश वेळी तसे योग्य करतात. त्यांनी योग्य व तटस्थ फोटोओळ (कॅप्शन) दिलीय. ती अतिशय पुरेशी, छोटीशीच आहे. "सकाळ"ने चार कॉलमात बातमी लिहितांना अतिशय संतुलित लिहिलीय. मूळ घटना जशीच्या तशी, पदरचे काही न घुसडता, स्वत:ची "मानसिकता" बातमीत डोकावू न देता वस्तुनिष्ठपणे लिहिलीय... आनंदराव आंबेकर व सचिन जोशी यांच्यासह "टीम सकाळ"चे अभिनंदन ... अशीच तटस्थ व वस्तुनिष्ठ पत्रकारिता यापुढेही घडत राहो.
आता "लोकमत" पाहा... संपूर्ण बायस्ड बातमी... "संघीय" मनोवृत्तीच्या माणसाची मते त्यातून जागोजागी डोकावताहेत. शीर्षक पाहा - "आक्षेर्पाह संदेश लिहिण्याचा प्रयत्न करीत असताना घडली घटना"!! कमाल आहे फारच; "आक्षेर्पाह" हे कोण ठरविणार? "गांधीजींची हत्या करणारा गोडसे....." हे जे काही प्रमोद इंगळे या तरुणाने लिहिलेय त्यात "लोकमत"ला काय आक्षेर्पाह दिसले? गोडसे नावाचा माथेफिरू हा महात्मा गांधी यांचा खुनी आहे, हे सत्य आहे... त्यात "अक्षेर्पाह" काय? वर "लोकमत"च्या बातमीत लिहिलेय की, रामानंदनगर पोलिसांनी युवकाला "समज" देवून सोडून दिले, त्याच्यावर "प्रतिबंधात्मक कारवाई" केली .... हा काय प्रकार आहे? "समज" द्यायचीच होती तर प्रमोद इंगळेला मारहाण करणाऱ्यांना द्यायला हवी होती,  "प्रतिबंधात्मक कारवाई" करायचीच होती तर मारहाण करणाऱ्यांवर करायला हवी होती; त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे होते. एरव्ही "फेसबुक"च्या कॉमेंटवरून गुन्हे दाखल करण्याची तत्परता जळगाव पोलीस दाखवतात मग इथे "नाहक" एका युवकाला मारहाण करणाऱ्यांना ते सोडून कसे देतात. हा तरुण "इंगळे" म्हणजे बहुजन समाजातील असावा... काय त्याने गुन्हा केला, काय त्याने चूक केली, हे पोलिसांनी व चुकीची, दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्या "लोकमत"नेही सांगावे. इथे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे आणि चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार केलाय पोलिसांनी. मंत्री, आमदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही "दादागिरी" होते आणि "लोकमत" त्यांना जाब विचारण्याऐवजी प्रमोद इंगळे या सत्य मांडणाऱ्या बहुजन समाजातील तरुणाला गुन्हेगार ठरवून एकांगी, विपर्यस्त, दिशाभूल बातमी लिहिते .... काय आहे काय हे? "लोकमत" चा "भाजपमत" झालाय की "संघमत"???
"गांधीजींची हत्या करणारा गोडसे....." हे 100% सत्य आहे... त्यात "आक्षेर्पाह" काहीही नाही. नथूराम गोडसे हा माथेफिरू खुनीच होता. "लोकमत"वाले त्याला "देशभक्त" आणि सत्य मांडणाऱ्या प्रमोद इंगळेला "देशद्रोही" ठरवू पाहत असतील तर "लोकमत"ने सरकार बदलताच दाखविलेले हे रंग व ही "स्वामीनिष्ठ" पत्रकारिताच निषेर्धाह व आक्षेर्पाह आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल...
लोकमत ई-पेपर लिंक :
टॉप सहा कॉलम
http://epaper.lokmat.com/epaperimages/Jal/2222016/22022016-lk-jhj-04/D27538676.JPG
सकाळ ई-पेपर लिंक :
घडीखाली, छोटी दाबून 4 कॉलम चिंचोळी
http://epaper3.esakal.com/22Feb2016/Enlarge/Jalgaon/JalgaonToday/index.htm
दिव्य मराठी ई-पेपर लिंक :
घडीखाली, छोटी दाबून फक्त फोटो ओळीत
http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/22022016/Aurbd-a4892655-large.jpg