एस.एम.देशमुख यांच्यापुढील आव्हाने !


 मराठी पत्रकार परिषदेसंदर्भातील एक पोस्ट व्हॉटस् गु्रपवर फिरत आहेत.नवे अध्यक्ष एस.एम.देशमुख हे याची दखल घेवून योग्य तो निर्णय घेतील,अशी अपेक्षा व्यक्त होतोय..
काय आहे ही पोस्ट वाचा...
 ...............
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.१९३९ साली स्थापन झालेल्या या संस्थेला ७७ वर्षे पुर्ण झाली आहेत.काकासाहेब लिमये हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते,आता एस.एम.देशमुख आहेत.एस.एम.यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यात ही संस्था कार्यरत आहे.जवळपास आठ हजार सभासद आहेत.या संस्थेचे पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आल आहेत.आता हे नवे पदाधिकारी काही ठोस निर्णय घेणार का,याकडे संबंध महाराष्ट्रातील पत्रकारांचे लक्ष वेधले आहे.
पुर्वी पत्रकारांची एकच संस्था होती,ती म्हणजे मराठी पत्रकार परिषद.मुंबई मराठी पत्रकार संघ वेगळा झाला आणि त्यांनी परिषदेपासून फारकत घेवून जागा बळकावली.त्यानंतर आज जे ३४ जिल्ह्यात जे पत्रकार भवन उभे आहेत,त्यावर अनेकांनी कब्जा केलेला आहे.तेथे काही पत्रकार संस्थानिक होवून बसले आहेत.
आपल्या मर्जीतील पत्रकारांना लिमिटेड सभासद करायचे,मग ते ऑफीसमध्ये शिपाई काम करत असेल तरी तो सभासद आणि जे खरोखरच पत्रकार आहेत,त्यांना सभासभापासून वंचित ठेवायचे हा त्यांचा डाव.हा डाव गेली अनेक वर्षे खेळला जातोय.एक तर निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि घेतले तर तेच ते पदाधिकारी निवडून येतात,त्यामुळे परिषदेपासून अनेकजण दुरावले असून,त्यांना पुन्हा परिषदेत आणण्याची जबाबदारी नव्या पदाधिका-यांची आहे.
अनेक जिल्हा संघाच्या निवडणुका नाहीत.त्यांना आजपर्यंत कोणी जाब विचारला नाही किंवा विचारला तर बेकिंमत देण्यात आली.त्यामुळे राजकीय लोकांना नावे ठेवणारे पत्रकारच स्वत: संस्थानिक होवून बसले आहेत.
रत्नागिरी,सोलापूर,उस्मानाबादमध्ये नेमके हेच घडतय.सोलापूरमध्ये मराठी पत्रकार परिषद विशिष्ठ लोकांच्या ताब्यात आहे,त्यामुळे तेथे श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जोमाने सुरू आहे.
उस्मानाबादमध्ये एका चौकडीने धुमाकूळ मांडलेला आहे.पत्रकार संघाची डबल मजली इमारत अस्तीत्वात असताना,शासनाकडे पत्रकार भवन अपुरे पडते म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून दहा लाख रूपये मंजूर करण्यात आले.त्यांनी तातडीने दोन लाख रूपये दिले.त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी तक्रार केल्यानंतर आठ लाख रूपये आले नाहीत.त्यावेळी अध्यक्ष असलेले राजेंद्र बहिरे यांनी मुख्यमंत्र्याकडून आलेल्या दोन लाख रूपयात सांजा रोडवर अर्धा एकर जमिन घेतली.या जमिनीचे बाजारमुल्य आता दोन कोटी आहे.त्यानंतर धनंजय रणदिवे यांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून हार्ट ऑफ सिटी जागेत  (आकाशवाणी समोर आणि स्त्री रूग्णालयाच्या बाजूला ) सहा हजार स्वेअर फुट  भूखंड घेतला.त्यावर डबल मजली इमारत बांधण्यासाठी सांजा रोडवरील अर्धा एकर जमिन विकण्याचा डाव विद्यमान पदाधिका-यांनी रचला होता.दोन कोटीचा भुखंड व्यवहार ४० लाख विक्री दाखवून बाकीचे १ कोटी ६० लाख रूपये चौघात वाटून घेण्याचे प्रयत्न सुरू होते.भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा डाव राजेंद्र बहिरे आणि भारत गजेंद्रगडकर यांनी उधळून लावला.तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी या जमिन विक्रीस तातडीने स्थगिती दिली होती.त्यामुळे ही दोन कोटीची जमिन वाचली.
आता गंमत अशी झाली आहे की,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची नोंदणीच राजेंद्र बहिरे यांनी केली आहे.हा संघ पुर्वी नोंदणीकृत नव्हता,तो मराठी  पत्रकार परिषदेशी सलग्न होंता.मराठी पत्रकार परिषदेच्या कागदपत्रावर त्यांना पत्रकार भवन,भुखंड,जागा मिळाली आहे,परंतु त्यांनी परिषदेलाच कोलण्याचे काम केले.त्यांनी परिषदेच्या नियम आणि अटीचे अनुपालन केलेले नाही.नव्या पदाधिका-यांची मुदत जून २०१५ मध्येच संपली आहे.जर निवडणुका घेतल्या नाहीत तर संघ आपोआप बरखास्त होतो,असे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या घटनेत लिहिले आहे.तरीही या नोदणी नसलेल्या या संघाचा कारभार सुरू आहे.बँकेत दहा ते बारा लाखाच्या ठेवी आहेत.त्या ठेवीही थातूरमाथूर खरेदी दाखवून खर्च केल्या जात आहेत.संघाचा खालचा मजला पुण्यनगरीस देण्यास आला आहे.त्याचे भाडे कुठे जाते,हा एक प्रश्न आहे.गावकरी रेडा स्वत:च्या चुका झाकण्यासाठी टकलू हैवाण आणि बांग्याच्या सल्लाने कारभार हाकतोय.
यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे पत्रकारांचा एक मोठा गट वेगळा झालेला आहे.उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ नोंदणी करण्यात आलेला आहे.त्याचे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी,अनंत अडसूळ नंतर आता महेश पोतदार आहेत.
एक तर उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार  संघाची नोंदणी राजेंद्र बहिरे यांच्याकडे आहे.परिषदेला हे पदाधिकारी कोलतात.निवडणुका नाहीत.तेव्हा संघ आपोआप बरखास्त झालेला आहे.तेव्हा सरळ सध्या असलेला  संघ बरखास्त करून मराठी पत्रकार परिषदेचे प्रशासकीस मंडळ तातडीने नियुक्त करावे.तरच आमच्यासारख्या पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेचे सभासद होता येईल आणि पारदर्शक कारभार होईल.
एस.एम.साहेब,या सर्व कारभाराची चौकशी करणार का ? संघ बरखास्त करणार का ? याचे उत्तर देणार का ?
- एक पत्रकार