औरंगाबादच्या काही पत्रकारांनी लाज-शरम सोडलीय !! बाजारात ३५० ते ७५० रुपयापर्यंत मिळणाऱ्या हेल्मेटसाठी आपल्या इज्जतीचा कचरा करून घेतलाय… "महाराष्ट्राच्या
मानबिंदु"च्या संपादकाने तर मान शरमेने घालावे असे वर्तन केलय…
त्याचे
असे झाले, औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे
प्रत्येक दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट वापरावे लागणार आहे. नेहमीच फुकटची
सवय लागलेल्या पत्रकारांची तर अधिक पंचायत झाली, त्यामळे त्यांनी
उद्योगपती
आणि अजित सीड्सचे मालक पद्माकर मुळे यांना हेल्मेट गिफ्ट देण्याची मागणी
केली, त्यानुसार मंगळवारी
पत्रकार संघात पोलिस आयुक्ताच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट भेट
देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी तब्बल 100 हुन अधिक पत्रकार हजर
...हेल्मेट 25 आणि पत्रकार 100 हुन अधिक, मग काय काही पत्रकानी रोष व्यक्त
केला, तेव्हा मुळे यांनी फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची यादी पाठवा,
हेल्मेट ऑफिस पोहच केले जातील असे अश्वासन दिले,
त्यानुसार
"महाराष्ट्राच्या
मानबिंदु" साठी काल बुधवारी 12 हेल्मेट आले होते ...ब्यूरो ऑफिस मध्ये
एकूण 25 आणि हेल्मेट 12 त्यामुळे हेल्मेटसाठी रिपोर्टरमध्ये ओढ़ाओढ़ी
सुरु झाली, तेव्हा सोलापूर, जळगाव करुन औरंगाबादला आलेले संपादक भाऊ पळत
आले
आणि वॉचमनला शिव्या घालून ते पार्सल का फोडले, असा जाब विचारला आणि नंतर एक
हेल्मेट काढून बाकी आपल्या मर्जीतील रिपोर्टरला वाटप केले,
भाऊकड़े तर कार आहे, त्यांना हेल्मेटची गरज नाही, पण त्यांनी हे हेल्मेट मुलीसाठी घेवून गेले, अशी माहिती मिळाली ...
आहे की नाही भाऊची कमाल आता संपादकच फुकटे असल्यानंतर बाकीचे कसे असतील ?
आज हेल्मेट मागितले, उद्या घरे बांधायला पैसे मागू नका अशा शब्दात गौरव करून अजित सीड्सच्या पद्माकर मुळेंनी पत्रकारांना मोफत हेल्मेट दिले.... असा गौरव होणे नाही!
औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्ती झाली आहे, त्यामुळे फुकट्या पत्रकारास हेल्मेट हवे आहे. अरे कुणी पत्रकाराना हेल्मेट देता का हेल्मेट ? असे म्हणण्याची पाळी आली आहे.