महिला पत्रकारास धमकी

देशभक्तीचा आव आणत राजधानी दिल्लीत पत्रकारांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्त आज मुंबईतील पत्रकारांनी प्रेस क्लब ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. अनेक ज्येष्ठ पत्रकार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चाची काही छायाचित्रे ट्वीट केल्यावर ज्येष्ठ पत्रकार निता कोल्हटकर यांना अमरेंद्र कुमार सिंग या ट्वीटर अकाऊंटवरून तुमच्यावर सामुहिक बलात्कार करू, अशी धमकी देण्यात आली याची तक्रारत आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलिसांनी रात्री उश‌िरा गुन्हा नोंदव‌िला.
मोर्चाची काही छायाचित्रे ज्येष्ठ पत्रकार निता कोल्हटकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट केल्यावर काही मिनिटांतच, अमरेंदर कुमार सिंग नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांना तू देशद्रोही असून तुझ्यावर दोन दिवसांतच सामुहिक बलात्कार करू, अशी धमकी देण्यात आली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत निता कोल्हटकर यांनी आझाद मैदान पोल‌िस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तातडीने या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, रात्री उश‌िरा पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल केला.