सांगली - शेळी पालनाच्या नावाखाली लाखो गोरगरीब लोकांची फसवणूक करणारा जागृती अॅग्रो फुडस् या चिटफंड कंपनीचा भामटा राज गायकवाड यास लवकरच जेलमध्ये पाठवण्याचे संकेत खा.किरीट सोमय्या दिले आहेत.
जागृती अॅग्रो फुडस् नावाची चिटफंड कंपनी काढून राज गायकवाड यांनी अनेक गोरगरीब जनतेला देशोधडीला लावले आहे.५ हजार रूपयापासून दहा लाख रूपये भरा आणि वर्षात दामदुप्पट करा,अशी गोंडस आणि भूलथापा देणारी स्कीम काढून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे.
गायकवाडवर अकोला,बुलडाणा,नागपूर आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.बीदरच्या जेलमध्ये पाच महिने हवा खावून आल्यानंतर या भामट्यास जग जिंकल्याचा आनंद होत आहे.मात्र त्याचा पर्दाफाश बेरक्याने सुरू केल्यानंतर त्याची गंभीर दखल खा.किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून खा.सोमय्या यांनी गायकवाडवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे गायकवाड येत्या काही दिवसात भापकर,मोतेवार,सत्पाळकरप्रमाणे जेलमध्ये गेल्यास आश्चर्य वाटू देवू नका.
खा.किरीट सोमय्या ट्वीट
#Ponzy Bogus #Chitfund Action initiated against #JatrutiAgro Group #RajGaikwad promising Ek ka Double-Jailed
केंद्रीय अर्थमंत्री यांना लिहिले पत्र
.......