मुंबई:
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर
छापल्याप्रकरणी 'महाराष्ट्र टाईम्स'चे तत्कालीन संपादकभारतकुमार राऊत,
पत्रकार संजय व्हनमाने, प्रकाशक श्याम दस्तूर यांना शिवडीच्या
दंडाधिकार्यांनी सहा महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी दहा
हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, दंडाधिकार्यांनी त्यांची
तातडीने जामिनावर सुटका केली. या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपिलात
जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. २00३ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक
संजीव कोकीळ यांच्यासंदर्भात 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये मजकूर छापून आला
होता. हे लिखाण बदनामीकारक असल्याचे म्हणत कोकीळ यांनी राऊत, व्हनमाने आणि
दस्तूर यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता.
|