'पुढारी'मध्ये मेगाभरती !


वृत्तसंपादकापासून वार्ताहरापर्यंत 88 जागा

पद्मश्रीच्या 'पुढारी'मध्ये 'मेगाभरती' निघाली असून,मुंबई,पुणे,कोल्हापूरसह सर्व आवृत्त्यामध्ये काल दि.25 मार्च रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.ही जाहिरात पाहिल्यानंतर पुढारीमधील पुर्वीचे कर्मचारी दुसरीकडे निघून गेले की,अशी शंका येवू लागली आहे.
आधीच अनेक दैनिकांत गुणवंत कर्मचार्‍यांची मारामार असताना पुढारीने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. सैन्यात जशी मेगा भरती होते, तशीच मेगा भरती पुढारी करणार असून, त्यासाठी 25 मार्चच्या अंकात जाहिरात दिली आहे. राज्यभरातील विविध कार्यालयांत वृत्तसंपादकापासून वार्ताहरापर्यंत तब्बल 88 जागा भरण्यात येणार आहेत. पद्मश्रींच्या या दणक्याने सर्वच वृत्तपत्रांच्या संपादक, मालकांची भंबेरी उडून गेली नसेल तर नवल!
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पणजी, बेळगाव, रत्नागिरी, कणकवली (सिंधुदुर्ग), सोलापूर या कार्यालयांत ही भरती होणार आहे. त्यात वृत्तसंपादक 10, मुख्य उपसंपादक 15, वरिष्ठ उपसंपादक 15, उपसंपादक 20, मुख्य वार्ताहर 8, वार्ताहर 20 या जागा भरण्यात येणार आहेत.
ज्यांना भरतीत सामील व्हायचे आहे, त्यांनी मॅनेजर, एचआर अँड अ‍ॅडमिन, पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि. 2318, सी वॉर्ड, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर या पत्त्यावर अर्ज करावेत. ई-मेलने अर्ज करताना jobs.hr@pudhari.co.in वर करावेत.