विठोबा सावंत आणि संदीप साखरेंना झी २४ तासमध्ये 'नो एन्ट्री' !

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख हे पुर्वी पुण्यात अधिकारी असताना,त्यांच्याविरूध्द झी २४ तासने एक खोटी न्यूज प्रसारीत केली होती,तेव्हा देशमुखांनी झी २४ तासवर दोन कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
याच देशमुखांची मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमाची चांगली बातमी झी २४ तासने काही दिवसांपुर्वी दाखवून बाईटही दाखवला,त्यामुळे संपादक असलेले डॉक्टर उदय निरगुडकर संतप्त झाले असून, न विचारता देशमुखांची चांगली बातमी का दिली म्हणून इनपूट आणि आऊटपूट हेडला कामावर न येण्याची सक्त ताकीद दिलेली आहे,इतकेच काय तर सुरक्षा रक्षकास या दोघांना आत प्रवेश देवू नये,असे फर्मान काढले आहे.
विठोबा सावंत आणि संदीप साखरे यांना हे आदेश देण्यात आलेत.ऑफीसमध्ये पुन्हा पाय ठेवू नका,असे आदेश भर न्यूजरूममध्ये देण्यात आले.इतकेच काय तर सुरक्षा रक्षकांना यांना आत सोडू नका,असे बजावण्यात आले आहे.
चांगली बातमी देवून विठोबा सावंत आणि संदीप सारखे यांनी कसलाही गुन्हा केलेला नाही,मात्र डॉक्टराच्या डोक्यात कायम दुश्मनी भरलेली असते.विठोबा सावंत आणि संदीप साखरे हे भले काही चुका करत असतील,त्याचा समाचार बेरक्याने अनेकवेळा घेतलेला आहे,मात्र या प्रकरणी आम्ही दोघांसोबत आहोत.डॉक्टरांची ही एकाधिकारशाही नव्हे का ?