मी मराठी विकत घेण्याचा डाव फसला

मुंबई - महेश मोतेवार जेलमध्ये जाताच,मी मराठी चॅनल बंद पाडून ते कवडीमोल किंमतीमध्ये विकत घेण्याचा डाव रचणा-या संपादकाची मी मराठीतून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे.या संपादकाची पोल बेरक्याने खोलल्यानंतर आता एक - एक सुरस कथा बाहेर येवू लागल्या आहेत.
कांचन धर्माधिकारी यांच्याकडून मी मराठी चॅनल विकत घेतल्यानंतर या चॅनलला ब-यापैकी टीआरपी होता आणि जाहिरातीही ब-यापैकी होत्या,परंतु मालक महेश मोतेवार जेलमध्ये जाताच,अवघ्या तीन महिन्यात हे चॅनल बंद पडले.बंद पडले म्हणजे ९० टक्के कर्मचारी दुस-या चॅनलमध्ये गेले आणि सर्व बुलेटीन बंद पडले.सध्या मी मराठीवर फक्त जुने शो दाखवण्यात येत आहेत.
मालक जेलमध्ये जाणार,याची कुणकुण संपादकांना अगोदरच होती.त्यामुळे त्यांनी हे चॅनल विकत घेण्यासाठी मोट बांधली.बीड विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आणि सध्या विधान परिषदेवर असलेल्या एका आमदारासोबत चॅनल विकत घेण्याची ही मोट बांधण्यात आली होती.त्यासाठी मालक जेलमध्ये जाताच,आता आपले काही खरे नाही,तुम्ही दुस-या चॅनलमध्ये जा अशी भीती घालून सर्व कर्मचा-यांना दुस-या चॅनलमध्ये पाठवण्यात आले.त्यानंतर हे चॅनल बंद पाडून त्याची किंमत १०० टक्यावरून ५ ते १० टक्के आणायची आणि ते विकत घ्यायचे,नंतर त्यात मोट बांधणा-या आमदाराची अप्रत्यक्ष मालकी ठेवून चॅनल सुरू करायचे असा डाव या संपादकांचा होता.मोतेवारनी ज्याच्यावर विश्वास ठेवला,त्यांनीच मालकाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला.
लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले निवासस्थान मी मराठी विकत घेणार,अशी पुडी याच संपादकांनी सोडली होती.त्यामुळे राज्य सरकार अडचणीत येत होते आणि मग सरकारने मोतेवारला जेलमध्ये पाठवले.संपादकांनी ही पुडी सोडली नसती तर मोतेवार अजूनही काही दिवस बाहेर राहिला असता.ज्याला कवचकुंडल म्हणून ठेवले त्यांनीच मालकाचा घात केला.
चॅनलची कवडीमोल किंमत करून आमदाराच्या मदतीने विकत घेण्याचा डाव रचण्यात आला होता,परंतु तो मालकाना उशिरा कळताच,अखेर या संपादकांची हकालपट्टी करण्यात आली.हकालपट्टी होणार,हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरना मुंबईत बोलावून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न या संपादकांनी केला,परंतु त्याचा डाव पुर्णपणे फसलेला आहे.
आता मी मराठीची सर्व सुत्रे तुळशीदास भोईटे यांच्याकडे देण्यात येणार आहेत.काही मोजक्या कर्मचा-यांना घेवून एक किंवा दोन बुलेटीन सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.मालक महेश मोतेवार सुटेपर्यंत चॅनल संथगतीने सुरू ठेवायचे आणि नंतर निर्णय घ्यायचा,अश्या हालचाली सुरू आहेत.