औरंगाबादेत 'पुढारी'ची जय्यत तयारी,'गांवकरी' लवकरच सुरू

औरंगाबाद - दैनिक पुढारीची औरंगाबाद आवृत्ती लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.शेंद्रा एमआयडीसीमध्ये प्रिटींग मशिनची फिटींग पुर्ण झाली असून,ट्रायल अंकही काढला जात आहे.आता आवृत्ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
मात्र पुढारीसाठी लायक माणसे मिळत नसल्यामुळे पद्मश्री थोडे धीराने घेत आहेत.पाच जूनचा मुहुर्त काढला जात असला तरी,१७ सप्टेंबर (मराठवाडा मुक्ती दिन )रोजी औरंगाबाद आवृत्ती सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकमत आणि दिव्य मराठीचे मालक महाराष्ट्राबाहेरचे आहेत.त्यामुळे पुढारीची औरंगाबादेत महाराष्ट्राच्या मातीतील दैनिक अशी जाहिरातबाजी होणार असल्याचे कळते.त्याचबरोबर १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन असल्याने वृत्तपत्र क्षेत्रातील मा XXX मुक्ती दिन म्हणून अलिखित घोषणा होणार आहे.
औरंगाबादहून जळगाव आवृत्तीही सुरू होणार असल्याची चर्चा आहे.औरंगाबादनंतर नागपूर आवृत्तीही सुरू होणार असल्याचे कळते.
त्याचबरोबर सोलापूरमध्ये एका प्रिंटीग युनिटशी पुढारीची  चर्चा सुरू असून,सोलापूर,उस्मानाबाद आणि लातूरसाठी सोलापूरहून अंक प्रिटींग होणार असल्याचे कळते.

'गांवकरी' लवकरच सुरू
दरम्यान,औरंगाबादेत बंद पडलेला गांवकरी नव्या रंगात आणि नव्या ढंगात लवकरच सुरू होत आहे.पोतनीसांची मालकी असलेल्या गांवकरीमध्ये आता आदर्श बँक आणि आदर्श दुध संस्थेचे सर्वेसर्वा अंबादास मानकापे यांची मालकी राहणार आहे.व्यवस्थापकीय संपादक म्हणून डॉ.अनिल फळे जॉईन झाले आहेत.सहाय्यक संपादक म्हणून दिनेश हारे तर चिफ रिर्पार्टर म्हणून नितीन गायकवाड जॉईन झाले आहेत.वितरणामध्ये मनिश जगनाडे तर जाहिरातीमध्ये पुण्यनगरीचे गोरे जॉईन झाले आहेत.गांवकरी ५ जून रोजी सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.एकूण पाने १२ किंवा १६ राहणार आहेत.


पत्रकाराची पत्रकारास शिविगाळ 
गडचिरोली- पत्रकाराच पत्रकारांचा खरा शत्रू आहे.पत्रकाराने पत्रकारास शिविगाळ करणे,हे काही नवे नाही.गडचिरोलीमध्ये प्रिंट मेल वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार यास सह्याद्री वाहिनीचा रिपोर्टर कृष्णा मस्के याने अश्लिल आणि अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
एका व्हॉटस् ऍप ग्रुपमध्ये झालेल्या संभाषणावरून आणि ग्रुपमधून एकास Remove करण्यावरून कृष्णा मस्केने दुडमवारास घाणरड्या शिव्या दिल्या.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात दुडमवारने फिर्याद दिली असून,पोलीसांनी मस्केविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे.