"लोकमत"च्या पुणे आवृत्तीचा अंक चाळता-चाळता आज छोट्या जाहिरातीत "आरोग्य"
या हेडखाली एक जाहिरात दिसली... "टीना देसाई हायप्रोफाईल फीमेल मॉडेल्स विथ
एसी रूम सर्व्हीस (24X7)"..... कुणी बिनडोक आणि अडाणी माणूसही सांगेल ही
कसली जाहिरात आहे.... यात "लोकमत"वाल्यांना कोणते "आरोग्य" दिसतेय? यांचेच
आरोग्य नं डोकी तपासण्याची गरज आहे... मारे "बाबू"वर निवेदन देऊन भूमिका
छापली पहिल्या पानावर 2-4 दिवसांपूर्वी... आणि या असल्या जाहिराती छापता??
हेच का तुमचं समाजाप्रती उतरदायित्व... केवळ निवेदने छापून कसे नामानिराळे
राहू शकतात वृत्तपत्रे?? मटके अन सट्टा जुगाराचे आकडे छापण्यापेक्षा हे
भयानक आहे.... का व्हावे तुमचे वर्गणीदार?? का व्हावे सखी न बालमंच सदस्य?
हे असले घाणेरडे सेवांचे नंबर हाती पडले नं कुतूहल म्हणून कोवळ्या पोरांनी
"आरोग्य सेवा" घ्यायची ठरविली तर?? थोडा तरी कॉमन सेन्स दाखवा की जाहिराती
स्वीकारताना... पोलिसांच्या समाजसेवा शाखा सुद्धा झोपल्यात की काय?? या
छोट्या जाहिरातीत पाहिजेत, मोबाईल टॉवर, पंचकर्म, क्विज, आरोग्य, कर्जविषयक
यातील 90% जाहिराती प्रथमदर्शनीच बोगस आणि फसव्या दिसताहेत सरळसरळ....
कुणी सखी गेली पंचकर्मला तर?