झुंझार पत्रकार , साहित्य सम्राट आचार्य
प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्यावतीने
देण्यात येणाऱ्या यंदाच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची
निवड करण्यात आली आहे . आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथी दिनी, येत्या १३ जूनला
सासवड येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रवीण बर्दापूरकर यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान केला जाणार आहे .
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष
विंजय कोलते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार
यांनी या पुरस्काराची घोषणा केली . कुमार केतकर , प्रकाश पोहोरे , किरण ठाकूर, राजीव खांडेकर ,
सुधीर भोंगळे , दीपक टिळक , संजय राऊत प्रभृती मान्यवर हे याधीचे, या पुरस्काराचे
मानकरी आहेत .
गेली
सुमारे पावणेचार दशके पत्रकारितेत असणाऱ्या प्रवीण बर्दापूरकर यांनी २६ वर्ष
विदर्भात पत्रकारिता केली आहे . ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृतीचे संपादकपद त्यांनी
भूषविले आहे तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक म्हणून त्यांनी दिल्ली
येथे काम केलेले आहे . नागपूर , मुंबई , दिल्ली , औरंगाबाद येथे एक वार्ताहर
म्हणून काम केलेले बर्दापूरकर , महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक घड्मोडींचे
भाष्यकार म्हणून परिचित आहेत . वृत्त्संकनाच्या निमिताने ४०वर देशांना भेटी दिलेले
प्रवीण बर्दापूरकर हे साल्सबर्ग सेमिनारची
अभ्यासवृती मिळवणारे एकमेव मराठी पत्रकार आहेत . पत्रकारिता आणि विविध
साहित्यविषयक १२ पुस्तके बर्दापूरकर यांच्या नावावर आहेत . सध्या ते ब्लॉगर आणि
मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत .