जालना - एका बँकेच्या संगीत कार्यक्रमाची चित्रफीत तयार करून
ती व्रूत्तपत्र, सोशल मीडिया व दूरचित्रवाणीला देवून बदनामी करून २ लाखाची
खंडणी मागितल्याप्रकरणी जालना येथील उपजिल्हाधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून
टीव्ही -९ मराठी वाहिनी, दैनिक दुनियादारी, दैनिक नामांतरच्या संपादकांसह ८
जणाविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल २०१६ मध्ये एका बँकेने आयोजित केलेल्या संगीत रजनीच्या कार्यक्रमात
जालना येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके हे नाच
करतांनाचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया, चॅनेल व
वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून तुझी नौकरी घालवितो, अशी धमकी देत शेळके
यांना २ लाखाची खंडणी मागितली होती.
याप्रकरणी टीव्ही-९ मराठी चित्रवाहिनी, दैनिक दुनियादारीचा बातमीदार, दैनिक दुनियादारीचे संपादक-मालक, दैनिक नामांतरचे संपादक सुभाष भालेराव, साप्ताहिक खूतवाचे संपादक संजय इंचे यांच्यासह सुधाकर निकाळजे, दिनकर घेवंदे, ज्ञानेश्वर नाडे या ८ जणाविरुद्ध भादंवि. २०७, ३८५, ५००, ५०१, ५३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषद, या दोन्ही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची स्वतंत्रपणे भेट घेवुन निवेदनाद्वारे केली आहे.